आयुष्यात हजारो माणसे येतील आणि जातील; परंतु आपल्या हजारो चुका माफ करणारे आई आणि वडील पुन्हा होणे नाही….
खरंतर आजचा विषय म्हणजे त्यावर लिहाव तितके कमी आणि शब्ददेखील कमी पडतील. आई-वडिलांची महती सांगणे म्हणजे विशाल सागराची उपमा कमी पडेल असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे आई आणि वडील… या दोन थोर व्यक्तींशिवाय आयुष्य अपुरे आहे. आई घराचे मांगल्य जरी असेल; परंतु वडीलदेखील घराचे अस्तित्व आहे. आयुष्यात यांचा हात पाठीशी असेल तर जणू सोबत विठ्ठल-रखुमाईच…. जीवनात आई आणि वडील हे एकमेव असे व्यासपीठ आहे जिथे आपल्या लेकरांना गुणदोषांसहित स्वीकारता. या स्वार्थी जीवनात नि:स्वार्थीपणे प्रेम, माया इथेच तर मिळते; परंतु सध्या त्यांचे असलेले उपकार आपण कालांतराने विसरतो का?
वाढते वृद्धाश्रम बघून खंत वाटते की जन्मदाता आई वडिलाना आता वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. मुलांच्या सान्निध्यापेक्षा त्यांना आश्रम सोईस्कर वाटते. स्वतःच्या घरात जर परकेपणाची जाणीव होत असेल तर काय उपयोग त्या मुलांचा.घराला घरपण येते ते फक्त आई-वडील त्यांच्या असल्याने… याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. आईने केलेला स्वयंपाक लक्षात ठेवणे तितकेच वडील ही आपल्या आयुष्याची शिदोरी करून ठेवता हे देखिल स्मरणात असायला हवे. आपली फाटकी बनियान न दाखवता मुलांच्या शाळेची फिज भरणारे वडील ही आपले अस्तित्व आहे. आईने केलेल्या कष्टाची जाणीव आणि वडिलांची कुटुंबाप्रति असलेली निखळ काळजी, प्रेम, निस्वार्थी माया ज्याला समजेल तो व्यक्ती कधीच हरत नाही. फार भाग्यवान आहेत ते ज्यांच्याकडे आई वडील दोन्ही ही आहेत. नाही गरज त्यांना काशी मथुरा करण्याची त्यांच्या सेवेतच त्यांना सर्व पुण्य मिळेल..
व्यापता न येणारे अस्तित्व म्हणजे आई…
आणि मापता न येणारे प्रेम म्हणजे वडील…
लिहिताना डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रू हेच सांगतो की, आई-वडील हे जगातील इतकी मोठी व्यक्ती आहे की, त्यांच्या कष्टाची किंमत कोणताच मुलगा मुलगी कोणत्याच जन्मी करू शकत नाही त्यांच्या घामाचा एक-एक थेंब आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठीच असतो. म्हणूनच तर त्यांच्या उपकाराला तोड नसते.. आईशिवाय घर रिकामे जरी वाटत असेल, पण वडिलांशिवाय आयुष्य अपुरे असते. याची जाणीव त्यांना जास्त असते ज्यांच्या डोक्यावरून आई किंवा वडील नावाचे छत्र बालपणात हरवलेले असते. म्हणून आहे तोपर्यंत त्यांना फुलाप्रमाणे जपा कारण हे सुख हा मायेचा आधार प्रत्येकाच्या नशिबात नसतो…
असे म्हणतात की, स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी निःस्वार्थी प्रेम करते तिला आई म्हणतात.परंतु डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतात त्यांना वडील म्हणतात. आणि माझ्या मते, ज्यांच्या घरी हे दोन्ही देव आहेत त्या घराला स्वर्ग म्हणतात…स्वामी तिन्हीं जगाचा आई-बाबांविना भिकारी….
आई रडते तेव्हा सर्वांना दिसते; परंतु एकट्यात आतल्या आत रडणारे बाबा कुणाच्या नजरेत येत नाहीत. त्यांनाही होतो त्रास जेव्हा मुलगी सासरी जाते. त्यांनाही काळजी वाटते जेव्हा मुलगा कामावरून लवकर घरी येत नाही. कठोर स्वभावमागे कुठेतरी हळवे आणि भावनिक मन दडलेले असते त्यामुळे घराचा आधार आई वडील दोन्हीही असता. आपली चप्पल पोराला यायला लागते तेव्हा समजते त्यांना की, अरे कष्टाच्या मागे धावता-धावता पोरगं खांद्याइतके झाले, पण संसाराचे ओझे काही हलके होईना, यात्रेला जाऊ म्हणता म्हणता गुढघे ही साथ द्यायला कमी पडता. अशा थकलेल्या आई- वडिलांना मुलांकडून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा असते की, आपली मुले शिकून मोठी व्हावी आणि त्यांना योग्य संस्कार असावे, त्याने प्रत्येक स्त्रीचा आदर करावा, मग त्यांचे कुठे काय चुकते. ज्या आई-वडिलांनी बोट धरून चालायचे शिकवलेत्यांची साथ आयुष्यभर सोडू नका, जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो तेव्हा जग भलेही दुरून बघत असेल, पण आई-वडील मात्र तिथेही आपल्यासोबत असता.
कुणीतरी खूप छान सांगितले की, जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल; परंतु कितीही पैसे खर्च केलेत तरी आईची माया आणि वडिलांचे प्रेम कधीच कुठे मिळणार नाही…. म्हणून आहे तोपर्यंत त्यांची जाणीव असूद्या. कारण त्यांचे स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे..
काही सेकंद सिग्नल वरती उभे राहून जेव्हा पैसे मागण्यास काही वयोवृद्ध माणसे येतात तेव्हा तो क्षण बघून काळीज स्थिर होऊन जाते आणि डोळ्यातील आलेले अश्रू सांगता की काय उपयोग मुलांचे शिक्षण पूर्ण करून जर आपल्या आई -वडिलांना दुसर्या कुणापुढे हात पसरावे लागत असतील, शिक्षण पूर्ण करून परदेशी पाठवून जर त्यांना आई-वडील ओझे वाटू लागतील आणि त्यांचा विसर पडू लागेल तर करोडोंची संपत्ती असूनही ती मुले विचारांनी मात्र भिकारीच. असता…
जसा पक्षांना आधार फांदीचा, वासराला आधार गाईचा, हरणाला आधार कळपाचा, जसा काट्यांना आधार फुलांचा, प्रकाशाला आधार उगवत्या भास्कराचा, तसाच तुम्हा आम्हा सर्वांना आधार आई-वडिलांच्या मार्मिक अस्तित्वाचा…. अथांग सागरातून एक थेंब काढून हा एक लेख लिहिण्याचा प्रयत्न केला कारण.. आई-वडिलांच्या त्यागापुढे जगातील सर्व शब्दसाठा अपूर्ण आहे. ही जाणीव आत्मीयता प्रत्येकाला जेव्हा समजेल तेव्हापासून कोणत्याच वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही..
आणि प्रत्येक व्यक्ती अभिमानाने बोलेल
आई- बाबा… थोर तुमचे उपकार ..
आई वात्सल्याची उबदार माया,
बाबा छाया प्रेरणेची,
अश्रू डोळ्यातील अबोल होऊन
वास्तूला गरज दोघांच्याही अस्तित्वाची…
आई पाझर मायेचा,
बाबा शिदोरी जीवनाची,
माझी जागा यांच्या चरणाशी
सदैव जाणीव असेल
तुमच्या थोर उपकारांची…..
सदैव जाणीव असेल
तुमच्या थोर उपकारांची….
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…