नाशिक

स्मार्ट सिटीचा कारभार मनपा आयुक्तांच्या हाती

सुमंत मोरेंसह कर्मचारी कार्यमुक्त

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना केंद्र शासनाने कार्यमुक्त केले असून, आता स्मार्ट सिटीचा कारभार मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या हाती देण्यात आला आहे. त्यामुळे येथून आता कंपनीच्या अध्यक्षांचे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे अधिकार आयुक्तांकडे असणार आहेत.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत नाशिक मनपाचा 2016 मध्ये समावेश करण्यात आला होता. दरम्यान, केंद्राने डिसेंबर 2025 नंतर मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. दरम्यान, पाच वर्षांत प्रकल्प करण्याची मुदत होती. परंतु, अपूर्ण कामांमुळे वारंवार ही मुदत वाढविण्यात आली आहे. आता कंपनीची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपुष्टात आली होती. स्मार्ट सिटीची जुने नाशिक आणि पंचवटी गावठाण भागातील कामेदेखील मोठ्या प्रमाणावर वादग्रस्त ठरली. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत झालेली बहुतांश कामे ही सातत्याने वादातच सापडल्याने महापालिकेची प्रतिमादेखील मलिन झाली. परंतु, अनेक शहरांमध्ये स्मार्ट सिटीची कामे अपूर्ण असल्याने केंद्र सरकारकडून डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या अध्यक्षांसह कार्यरत विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेईकल) मधील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनाही कार्यमुक्त करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत. नाशिकसह राज्यातील सर्वच स्मार्ट सिटी कंपन्यांना केंद्र सरकारकडून निधी मिळणार नसल्याने त्यांच्या मालमत्ता संबंधित महानगरपालिकांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.

The administration of Smart City is in the hands of the Municipal Commissioner.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago