नाशिक

प्रशासकीय राजवटीतील कारभार मांडला जाणार

महासभेत श्वेतपत्रिका सादर करण्याची शक्यता

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट असताना मोठ्या प्रमाणात विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. यात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, उद्याने, स्वच्छता तसेच शहरातील पायाभूत सुविधांशी संबंधित कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, या कामांत पारदर्शकपणा नसल्याचा आरोप नगरसेवकांनी करत प्रशासनाने श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार येत्या महासभेत प्रशासनातर्फे चार वर्षांचा कारभार मांडला जाण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सर्व विभागांकडून केलेल्या कामांची माहिती मागितली होती. त्यानुसार ती जमा केल्याचे समजते आहे. महासभेत या विषयावर सविस्तर चर्चा होऊन काही प्रकरणांची चौकशी करण्याची मागणीही होऊ शकते, अशी चर्चा आहे. नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात मंजूर झालेल्या विविध विकासकामांशी संबंधित श्वेेतपत्रिका पुढील महासभेत सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

श्वेतपत्रिकेतून प्रशासकीय काळात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय, मंजूर निधी, खर्चाचा तपशील, तसेच विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा समोर येणार असल्याने महापालिका वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. 13 मार्च 2022 पासून जानेवारी 2026 पर्यंत आता नव्या महासभेत या कामांच्या प्रक्रियेवर तसेच खर्चाच्या पारदर्शकतेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काही नगरसेवकांकडून प्रशासकीय कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची माहिती मागविण्यात आली असून, संबंधित विभागांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. विशेषतः निविदा प्रक्रिया, कामांचा दर्जा व निधी वापराबाबत प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

The administration of the administrative regime will be presented.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago