महापालिका नगरसचिवचा कारभार प्रभारींकडेच

लोकप्रतिनिधींच्या सत्तेत पूर्णवेळ अधिकारी मिळणार का?

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत दोन वर्षांपासून नगरसचिवपद रिक्त असल्याने प्रभारींच्या हातूनच या महत्त्वाचा पदाचा पदभार हाकलला जातो आहे. दरम्यान, प्रशासकीय राजवटीत चालले, मात्र नुकतीच लोकप्रतिनिधींची सत्ता आली आहे. मात्र आतातरी पालिकेला पूर्णवेळ नगरसचिव मिळणार की नाही, असा प्रश्न केला जातो आहे.
महासभा, स्थायी समिती, विषय समित्या तसेच विविध प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत नगरसचिवाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सध्या हे पद प्रभारी स्वरूपात कार्यरत अधिकार्‍याकडे आहे. याच कार्यालयातून महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ही जबाबदारी सांभाळणारे मदन हरिश्चंद्र यांच्याकडे एकाचवेळी पंचवटी विभागीय कार्यालयाची जबाबदारी असून, याबरोबरच त्यांच्याकडे तब्बल तीन महत्त्वाच्या पदांचा कार्यभार आहे. तसेच सातत्याने पंचवटी विभागीय कार्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे नगरसचिव कार्यालयातील कामांवर ताण येत आहे. अशा स्थितीत, महापालिकेतील महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी नगरसचिवाची नियुक्ती होणे गरजेचे असल्याची मागणी पुढे येत आहे. याशिवाय, हरिश्चंद्र मदन मार्चमध्ये सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी कोण येणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान, तत्कालीन नगरसचिव राजू कुटे यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले. तेव्हापासून आजतागायत प्रभारीवर नगरसचिवचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधीची सत्ता आल्याने आता तरी पूर्णवेळसाठी नगरसचिव मिळणार की नाही हे लवकर समजणार आहे.

The administration of the Municipal Secretary is with the in-charge.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *