आ. पंकज भुजबळ : अहिल्यादेवी होळकर घाट, बोटिंग क्लबची पाहणी
येवला : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना विसर्जनासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करावे. विसर्जन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी घाट परिसरातील स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, सुरक्षिततेच्या उपाययोजना, गर्दीचे नियोजन तसेच आवश्यक सुविधा वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट
निर्देश आमदार पंकज भुजबळ यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
आमदार भुजबळ यांनी अंगणगाव (येवला) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तसेच बोटिंग क्लब परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मोठ्या संख्येने येणार्या भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घाट परिसरात नियमित स्वच्छता राखणे आणि विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे.
सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवणे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेणे.बोटिंग क्लब परिसर नागरिकांसाठी सुरक्षित व व्यवस्थित राखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि सुकर वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कोणतीही हलगर्जी न करता सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे आमदार भुजबळ यांनी सांगितले. यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
The administration should remain prepared for the safety of the immersion ceremony.