नाशिक

दमदार लूक असलेल्या ‘टाटा सियारा’चे नाशिक शहरात आगमन

कामू मोटर्स शोरूममध्ये जोरदार स्वागत

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील नाशिक अंबड येथील कामू मोटर्स शोरूममध्ये बहुप्रतीक्षित नवीन टाटा सियारा वाहनाचे अत्यंत दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात 22 डिसेंबर रोजी आगमन झाले आहे.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले. या शुभप्रसंगी सर्वप्रथम सकाळी काळाराम मंदिर येथे पंडितजींच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजन करून या नव्या वाहनाचे स्वागत करण्यात आले. पूजनानंतर टाटा सियाराचा भव्य रोड शो करण्यात आला. वाजतगाजत निघालेला रोड शो मुंबई-आग्रा हायवे अंबड टाटा शोरूम येथे झाला. या ‘रोड शो’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मोठ्या संख्येने वाहनप्रेमी व नागरिकांनी यात सहभाग नोंदविला. टाटा सियारा ही गाडी आकर्षक डिझाइन, आधुनिक वैशिष्ट्ये आणि दमदार लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. टाटा सियारा पेट्रोल आणि डिझेल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. कामू मोटर्स येथे या वाहनांचा अत्यंत भव्य असा आगमन सोहळा पार पडला. हॅरिजन व्यू स्क्रीन (ट्रिपल), आ-र्किड गेमिंग स्क्रीन, पॅनोरोमॅक्स फुल सनरूफ, एक्सटेंडेड थाई सपोर्ट, सुपर ब्लाइंड सस्पेन्स, डीआर एलईडी पोस्ट मोड, रॅप अराउंड ग्लास डिझाइन अशी या सियारा गाडीची वैशिष्ट्ये आहे. या सोहळ्यानंतर टाटा सियाराची गाडी नाशिककरांसाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनप्रेमी नागरिकांनी कामू मोटर्स येथे भेट देऊन या नव्या मॉडेलचा अनुभव घ्यावा, असे आवाहन कामू मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकेश चंद्रात्रे यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांत कामू मोटर्सने ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा दिली आहे. यामुळे टाटाच्या वाहनांना मोठी मागणी वाढली आहे. यानुसारच नव्या टाटा सियाराला ग्राहकांची पसंती आहे. अनेक जण या वाहनाच्या प्रतीक्षेत होते, ती आता संपली आहे. ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकेश चंद्रात्रे यांनी यावेळी केले.

The arrival of the powerful looking 'Tata Ciara' in Nashik city
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago