राजीवनगरच्या हिरकणी हास्य क्लबचा सामाजिक उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमा हा सुवासिनींचा महत्त्वाचा सण! त्या दिवशी सुवासिनी एकत्रितपणे वटवृक्षाचे पूजन करतात. मनोभावे पूजा करून आशीर्वाद मागतात. वटवृक्षाला सूत गुंडाळणे हा पारंपरिक चालत आलेला रिवाज आहे. परंतु दुसर्या दिवशी वटवृक्षाला गुंडाळलेले सूत, पायाशी पडलेले निर्माल्याचे ढीग हे पाहून राजीवनगर येथील हिरकणी हास्य क्लबच्या महिलांना वाईट वाटले. त्यांनी तातडीने गुंडाळलेले सूत काढून वटवृक्षाला बंधनातून मुक्त केले.
राजीवनगर येथील श्री स्वामी समर्थ उद्यानात हास्य क्लबच्या महिला नेहमीच येतात. या ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाजवळ वटपौर्णिमेला मोठ्या संख्येने आलेल्या महिलांनी पूजन केले होते. पूजेनंतर निर्माल्य तेथेच ठेवून गेल्या होत्या. त्यामुळे त्याचा मोठा ढीग जमा झाला होता.
सर्वच वनस्पती या सजीव आहेत. त्यांची अशी परिस्थिती पाहून खूप वेदना होतात. या वडाच्या झाडाला स्वच्छ करण्याच्या हेतूने हिरकणी हास्य क्लबच्या सर्व भगिनींनी झाडाला बांधलेले सूत, खाली पडलेले निर्माल्य गोळा करून स्वच्छता मोहीम राबवली व एक आदर्श समाजापुढे ठेवला.
हास्य क्लबच्या सर्व भगिनी ज्येष्ठ नागरिक आहेत. तरीही उत्साहाने सर्व भगिनींनी यात सहभाग घेतला व आनंदाने परिसर स्वच्छ केला. याबद्दल क्लबच्या अध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
या सामाजिक उपक्रमात क्लबच्या अध्यक्षा सविता एरंडे व लीला कुटे, सुनंदा सोनवणे, अरुणा सोनवणे, छाया पंडित, रजनी सराफ, सविता गिते, कुसुम जोशी, वासंती कुलकर्णी, सिंधू सोनारे, विजया कदम, कोकिळा चौधरी या भगिनींनी सहभाग घेतला.
पारंपरिक सण आणि उत्सव साजरे करत असताना त्या-त्या वेळेस आवश्यक असलेली स्वच्छता आणि मूळ स्वरूप त्या ठिकाणी बहाल केले पाहिजे. या भावनेतून ही स्वच्छता केली. अशाच प्रकारचा पुढाकार इतर ठिकाणीही महिलांनी घ्यावा.
– सविता एरंडे, अध्यक्षा,
हिरकणी हास्य क्लब, राजीवनगर
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…