नाशिक

चर्चेचे गुर्‍हाळ; महायुतीचा तिढा संपता संपेना!

भाजप मित्रपक्षांचा करेक्ट कार्यक्रम करणार?

नाशिक : प्रतिनिधी
नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मागे टाकत जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरलेल्या शिंदेसेनेला नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने अद्याप टाळी दिलेली नाही. त्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते यांची बैठक झाली खरी; परंतु जागावाटपावर कुठलाही निर्णय न घेता भाजप शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कोंडी करत आहे का? अशी चर्चा शहरात होते आहे. दरम्यान, मित्रपक्षांना चर्चेत गुंतवून ठेवत ऐनवेळी स्वबळाची घोषणा करायची, अशी खेळी भाजपची असल्याची चर्चा होत आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात जागावाटपावरून एकमत झालेले नाही. शिंदेसेना 45 जागांवर ठाम राहिल्याने चर्चांना ब्रेक लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार ते सहा जागा देण्याच्या भूमिकेवर भाजप अडून बसल्याची चर्चा
आहे.
शिंदेसेनेकडून महायुती सरकारमधील भागीदारी, संघटनात्मक ताकद व मागील निवडणुकीतील कामगिरीचा दाखला देत शहरात किमान 45 जागांची मागणी करत तसा प्रस्तावच भाजपल ा दिला आहे. पण भाजपकडून याबाबत हिरवा कंदील मिळालेला नाही. सन्मानजनक जागावाटप न झाल्यास स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा शिंदेसेना देत आहे. जागावाटपात अपेक्षित न्याय न मिळाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका शिंदेसेनेतील नेत्यांकडून खासगीत घेतली जात आहे. जागावाटप रखडल्याने महायुतीत अस्वस्थता वाढत असल्याचे सध्या दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून (दि. 23)सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही महायुतीवर कुठलाही निर्णय झालेला नाही.
भाजप काही तोडगा काढणार की नाही, याकडे शिंदेसेनेसह अजित पवार गटाचे लक्ष लागले आहे. शिंदेसेनेतील इच्छुकांनी काही प्रभागांत तयारी सुरू केली आहे. तसेच त्यांनी 122 जागांसाठी सर्वच्या सर्व 31 प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

ठाकरे बंधूंचा युतीला धसका?

बहुप्रतीक्षित शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीची घोषणा बुधवारी (दि. 24) झाली. त्यानंतर त्याचा परिणाम नाशिक महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ठाकरे बंधूंचा धसका महायुतीने घेतल्याची चर्चा आहे.

 

The buzz of discussion; The Mahayuti's tussle is not over yet!
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago