जय जगन्नाथाच्या जयघोषात शहर दुमदुमणार

गुरुवारी रथयात्रा, हजारो भाविकांची उपस्थिती राहणार

नाशिक : प्रतिनिधी
यंदाही मोठ्या उत्साहात भव्यदिव्य स्वरूपात शहरात भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (दि.16) सकाळी दहा वाजता जुना आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून यात्रेचे प्रस्थान होईल. तत्पूर्वी, सकाळी आठ वाजता भगवान श्रींची पूजा, आरती, शृंंगार करून भगवान श्रींचे रथात आगमन होऊन रथयात्रेला प्रारंभ होईल, अशी माहिती श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समितीचे प्रमुख महंत डॉ. भक्तिचरणदास महाराज यांनी दिली.
पंचमुखी हनुमान मंदिरात शुक्रवारी (दि. 10) श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळ्याच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात होते. महंत भक्तिचरणदास महाराज रथयात्रेविषयी बोलत होते. यावेळी रथयात्रेचे अध्यक्ष नागेश चव्हाण, स्थायी सभापती तथा कार्याध्यक्ष मच्छिंद्र सानप, सचिव हर्षद बेळे, जनसंपर्क प्रमुख शशी हिरवे, मंदिर ट्रस्टी मधुसूदन काबरा, बाळासाहेब पाठक, नरहरी उगलमुगले, सचिन लाटे, रथ सजावट करणारे सुनील घुमरे, छावा भारत क्रांती मिशन समन्वयक विलास पांगरकर आदी उपस्थित होते. पंचवटीतील श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समितीतर्फे श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळ्यानिमित्ताने 29 जुलैपर्यंत पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या बुधवारी (दि. 15) तपोवनातील आठवण लॉन्स येथे रथप्रतिष्ठा, हवन व आरती होणार आहे. गुरुवारी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची महाआरती होईल. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सातला हभप प्रेरणा बेळे यांचे नारदीय कीर्तन, सरला चांडक माहेश्वरी यांचे संगीतमय सुंदरकांड, मंजू दाधिच यांचे भजन, महर्षी चित्रपट संस्थेतर्फे धार्मिक व सामाजिक लघुपट प्रदर्शन, पुष्पांजली महिला भजनी मंडळातर्फे संगीतमय सुंदरकांड, मंगलाताई दाते संचलित स्वरसाधना ग्रुप नाशिकरोड, श्री बालाजी फाउंडेशन महिला व आरोही भजनी मंडळातर्फे भजन, रामनाम संगीत साधना ग्रुपतर्फे सुरेंद्र जालिहालकर यांचा गीतरामायण कार्यक्रम, मुक्तानंद भजनी मंडळातर्फे भजन, स्वरसाधना ग्रुपतर्फे भक्तिगीते व भावगीते, भक्तिरसधारा ग्रुपतर्फे 108 श्री हनुमान चालीसा पाठ, सु-संस्कृती फाउंडेशनचा भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. 29 जुलैला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन होऊन महाप्रसाद होईल.

रथयात्रेचा मार्ग असा…
रथ पंचमुखी हनुमान मंदिर, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, सीतागुंफा, काळाराम मंदिर, नाग चौक, कृष्णनगर येथून येऊन हनुमान मंदिर येथे समारोप होईल.

 

The city will resound with chants of ‘Jai Jagannath’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *