नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा जाणवू लागला आहे. रविवारी (दि. 15) नाशिक शहराचे किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअस, तर निफाडचे तापमान 11 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत असल्याने नागरिकांना आता खर्या अर्थाने हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हवामानातील बदलामुळे सकाळी घराबाहेर पडणारे नागरिक स्वेटर, जॅकेट आणि मफलरचा वापर करू लागले आहेत. विशेषतः गोदाकाठ, मोकळी मैदाने परिसर आणि शहराच्या उपनगरांमध्ये पहाटेच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. काही ठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेतानाही दिसत आहेत.दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारठा
नाशिकमध्ये दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. रविवारी शहराचे कमाल तापमान 31.6 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका आणि सूर्यास्तानंतर थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. उत्तरेकडून वाहणार्या थंड वार्यांचा परिणाम तापमानातील घसरणीवर होत आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, पहाटेच्या तापमानात आणखी चढ-उतार होऊ शकतात. वाढत्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विशेषतः गहू, हरभरा, ज्वारी आणि कांदा उत्पादक शेतकर्यांना थंड हवामानाचा फायदा होऊ शकतो.
The cold has intensified; the mercury has dropped to 12.6 degrees!
- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…
- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…
- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…
- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…
- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…
विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…