नाशिक

सुट्टयांमुळे नाशकात पर्यटकांची गर्दी

सोमेश्वर गोदाघाटासह त्र्यंबक दर्शन

नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी, शनिवार आणि रविवार अशा लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांचा मुहूर्त साधत पर्यटकांनी पर्यटनासाठी नाशिकला पसंती दिली आहे. सलग सुट्ट्यांमुळे शहरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, हॉटेल्स आणि लॉज हाउसफुल झाले आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांतील पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरातील पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे.
सुट्ट्यांच्या काळात धार्मिक पर्यटनस्थळांना भेटी देण्याकडे पर्यटकांचा अधिक कल असतो. त्यानुसार शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांसह त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगगड आणि शिर्डी येथे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व तामिळनाडू या राज्यांमधून पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
शहरातील पंचवटी परिसरातील रामकुंड, कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, गोरेराम मंदिर, इंद्रकुंड, तपोवन यांसह मुक्तिधाम, भगूर आणि पांडवलेणी या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी दिसत आहे. शहरातील प्रमुख पर्यटनस्थळे पाहता यावीत, यासाठी पर्यटकांकडून नाशिक दर्शनालाही पसंती दिली जात आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील हॉटेल, भोजनालये आणि खानावळींत गर्दी होत आहे. विशेषतः पंचवटी परिसरातील हॉटेल्स व लॉजमध्ये पर्यटकांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणे हाउसफुल झाली आहेत. पर्यटनस्थळांबरोबरच खाद्यपदार्थांच्या व्यावसायिकांनाही सुट्ट्यांचा फायदा होत आहे.
नाशिकचे आल्हाददायक वातावरण हे पर्यटकांच्या पसंतीचे प्रमुख कारण ठरत आहे. मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांपासून नाशिक जवळ असल्याने या भागांतील पर्यटकांचा ओघ अधिक आहे. धार्मिक पर्यटन, निसर्गरम्य परिसर आणि सुट्ट्यांचा योग यामुळे नाशिकमध्ये पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

सिंहस्थाच्या कामांमुळे पर्यटकांचा हिरमोड

शहरात विविध ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकासकामे सुरू असल्याने अनेक मार्ग बंद, तसेच रामकुंडात पाणी नसल्याने नाशिक शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत असल्याचे चित्र आहे.

 

Rush of tourists in Nashik due to holidays

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दिवे उजळले, पण श्वास कोंडला!

- अश्विनी पांडे निसर्गाची मुक्त उधळण, आल्हाददायी हवामान, हिरवळ आणि तुलनेने शुद्ध हवा ही नाशिकची…

16 hours ago

सभागृहातील सत्तेच्या विकेंद्रीकरणाला ‘ब्रेक’!

- गोरख काळे येत्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा सोपस्कार पार पडणार असून, महापौर हिमगौरी आहेर-आडके…

16 hours ago

‘धरती आबा’ बिरसा मुंडा

अन्यायाविरुद्ध पेटलेला स्वाभिमानाचा अग्निकुंड! - ग्रीष्मा नागमोती ज्या भूमीवर पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केले, ज्या जंगलांनी जगण्याचा…

16 hours ago

संकटातून संधीकडे…

दुष्काळावर मात करणारा जलसंधारणाचा ’पेठ पॅटर्न’ - देवयानी सोनार यंदा पावसाची अवकृपा झाल्याने नाशिक जिल्ह्यातील…

16 hours ago

दिवाळीतील एक्यूआय समजून घेऊया…

सध्या एक्यूआय अर्थातच ’एअर क्लॉलिटी इंडेक्स’ आणि त्यावरील आकडेमोड मीडियातील सर्वांत महत्त्वाची बातमी बनवून राहिली…

17 hours ago

इस्रायली सत्तासंघर्ष

आशिया खंडातील पश्चिम भागात असलेला इस्रायल हा एक छोटा देश आहे. पॅलेस्टाइनवरील ब्रिटिश राजवट संपुष्टात…

17 hours ago