नाशिक

फॅमिली डॉक्टर संकल्पना दुरावली

जागतिक कौटुंंबिक डॉक्टर दिन

नाशिक : प्रतिनिधी
बदलत्या काळासोबत डॉक्टर-रुग्ण नाते बदलत चालले आहे. खरे सांगायचे तर ते नातं दुरावत चाललेले आहे. पूर्वी फॅमिली डॉक्टर एखाद्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात, नात्यात, महत्त्वाच्या प्रसंगांत सहभागी असायचे. पण मागील काही वर्षांत विशेषतः कोविडपासून हे नाते अधिक कमावण्याचे साधन बनले आहे. रुग्ण डॉक्टरांपेक्षा रुग्णालयावर अधिक भर देताना दिसतात. मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये उपचार घेण्यास रुग्ण पसंती देत आहेत. तिथे डॉक्टर कोण आहे, याची माहिती नसते. बर्‍याचदा तर माझा इलाज कोण करतंय, उपचाराची जबाबदारी कुणी घेतली आहे, याचीही कल्पना नसते. यात रुग्णाचे नुकसान होते असे म्हणता येणार नाही; परंतु, उपचारात मानवी स्पर्श, मानसिक आधार आणि डॉक्टर-रुग्णांत विश्वासाचा अभाव असल्याचे दिसून येते.
घरातील कोणी आजारी पडले तर पूर्वी फॅमिली डॉक्टरकडे नेण्याची प्रथा (?) होती. कारण फॅमिली डॉक्टरला आपल्या घरातील प्रत्येकाची नस माहिती असते, असे गमतीने म्हटले जायचे. एकाअर्थी ते खरेही होते. त्यामुळे दुसर्‍या कोणत्या डॉक्टरकडे दाखवण्याचा प्रश्नच येत नव्हता. कारण दुसर्‍या डॉक्टरला दाखवायचे तर पुन्हा सर्व तपासण्या, वेगळी औषधे किंवा तपासणी फी आदी कारणांमुळे शक्यतो प्रत्येक कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर हा ठरलेला असायचा. पण बदलते तंत्रज्ञान आणि काळानुसार तज्ज्ञ डॉक्टरांचा ट्रेंड आल्याने प्रत्येक रुग्णाला तज्ज्ञांचा सल्ला किंवा उपचार घेण्याबाबत आग्रह केला जाऊ लागला.
बदलत्या काळासोबत डॉक्टर- रुग्ण अंतर वाढल्याचे चित्र आहे. तरीही मानसिक आधार, विश्वास आणि मार्गदर्शनासाठी कौटुंबिक डॉक्टरांची गरज आजही तितकीच महत्त्वाची असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीत तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट आरोग्य व्यवस्थेच्या वाढत्या प्रभावातही फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कालबाह्य झालेली नसून, उलट मानसिक आधार, विश्वास आणि वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शनासाठी अधिक आवश्यक बनत असल्याचे या तज्ज्ञांच्या मतांवरून दिसते.

पूर्वीपेक्षा डॉक्टर-रुग्ण नात्यात अंतर वाढले
पूर्वी फॅमिली डॉक्टर हे कुटुंबाचा भाग असायचे. आज उपचार अधिक व्यावसायिक झाले असून, रुग्ण मोठ्या रुग्णालयांकडे वळत आहेत. त्यामुळे मानवी स्पर्श आणि मानसिक आधार कमी होताना दिसतो.
– डॉ. संजय धुर्जड

मानसिक आरोग्यासाठी फॅमिली डॉक्टर महत्त्वाचे
छोटे कुटुंब, संवादाचा अभाव आणि स्क्रीन व्यसनामुळे मानसिक समस्या वाढल्या आहेत. अशा वेळी कुटुंबाला ओळखणारे फॅमिली डॉक्टर प्राथमिक स्तरावर मदत करू शकतात.
– डॉ. स्वाती चव्हाण, मानसोपचारतज्ज्ञ

प्रतिबंधात्मक आरोग्यावर भर आवश्यक
आजचा रुग्ण तत्काळ आराम शोधतो, पण शाश्वत आरोग्यासाठी योग्य जीवनशैली, आहार आणि संयम महत्त्वाचा आहे.
– डॉ. हेमंत सोननीस

फॅमिली डॉक्टर म्हणजे हेल्थ गाइड
आज कौटुंबिक डॉक्टर केवळ उपचार करणारे नाहीत, तर आरोग्य मार्गदर्शक बनले आहेत. योग्य माहिती आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यावर भर देणे गरजेचे आहे.
– डॉ. किरण वैभव कातकाडे, एमडी-आयुर्वेद

आरोग्यमित्र म्हणून भूमिका महत्त्वाची
कौटुंबिक डॉक्टर हा प्रत्येक घराचा आरोग्यमित्र असतो. विश्वास, संवाद आणि सातत्यपूर्ण फॉलोअपमुळे उपचार अधिक प्रभावी होतात.
– डॉ. संगीता लोढा, बालरोगतज्ज्ञ

The concept of family doctor has become obsolete.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

20 minutes ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

27 minutes ago

समाजाची अधोगती…

गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…

30 minutes ago

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक

सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…

38 minutes ago

बेरोजगार युवक परजिवी; झुरळ नक्कीच नाहीत!

एकीकडे महाग झालेले शिक्षण, त्यातच शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि झालेला बट्ट्याबोळ, त्यात भर पडत आहे…

44 minutes ago

उशिरा, पण अपरिहार्य

केंद्रशासित पुद्दुचेरीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सुवेंदू अधिकारी, आसाममध्ये भाजपाचेच…

53 minutes ago