नाशिक

अधिकारी दर सोमवारी सार्वजनिक वाहनाने येणार

महानगरपालिका आयुक्त खत्री यांच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यात एकूण 19 उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी महापालिका मुख्यालय तसेच सहाही विभागीय कार्यालयांतील सर्व विभागप्रमुख, तसेच कर्मचार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आपल्या कर्मचार्‍यांना दर सोमवारी खासगी वाहनाऐवजी सायकल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची सूचना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना इंधन बचतीबरोबरच राष्ट्रीय साधन संपत्तीचा जपून वापर करण्याबाबत आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश सर्व शासकीय यंत्रणांना देत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेपाठोपाठ आता नाशिक महापालिका प्रशासनानेदेखील आवश्यक पावले उचलली आहेत. याआधी महासभा व स्थायी समितीच्या सभाही ऑनलाइन घेण्याची भूमिका महापौरांनी घेतली आहे. महापालिकेत वाहनांची संख्या कर्मचार्‍यांएवढीच असल्याने त्यावर इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. इंधनासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महापालिकेने आपल्या कर्मचार्‍यांना दर सोमवारी सार्वजनिक वाहतुकीद्वारे येण्याबाबत आवाहन केले आहे. ऊर्जाबचत, इंधन वापरात संयम, सार्वजनिक संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यावर भर देण्यात आला आहे. नाशिक महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रत्येक सोमवारी कार्यालयात येण्यासाठी व परत जाण्यासाठी स्वत:च्या खासगी वाहनाचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची सूचना मनपा आयुक्तांनी आपल्या कर्मचार्‍यांना केली आहे. महापालिकेत सध्या सात हजार कर्मचार्‍यांपैकी जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होंत आहे.

राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत दर सोमवारी अधिकारी, कर्मचार्‍यांना सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्यात येत आहे.
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा

The officer will come by public transport every Monday.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago