लैंगिक छळ प्रकरणात रवींद्र एरंडेच्या पोलीस कोठडी बाबत कोर्टाने दिला हा निर्णय

सातपूर: प्रतिनिधी

सातपूर परिसरात लैंगिक शोषण व फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तथाकथित पत्रकार तसेच कन्सल्टंट रवींद्र एरंडे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. एरंडे याने लैंगिक शोषण केलेल्या आणखी 8 महिलांची ओळख पटवण्यात आल्याने एरंडे च्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाचा अजून तपास करायचा असल्याने पोलिसांनी कोठडी वाढून मागितली होती. न्यायालयाने आणखी 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक शोषण व फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी रवींद्र नारायण एरंडे (वय 63, रा. नीलकंठेश्वरनगर, अशोकनगर, सातपूर)  दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसात पोलिसांनी एरंडे याच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. .  त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित एरंडे याने  गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल झाली होती. तसेच संबंधित महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणात तपासादरम्यान संशयिताकडून सुमारे 100 हून अधिक महिलांशी संबंधित व्हिडिओ असलेला पेन ड्राइव्ह, डीव्हीआर जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणात आणखी पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सातपूर च्या नागरिकांना धक्का

पत्रकारिता करत असलेल्या एरंडे याने सातपूर कॉलनी भागात स्वतःचे चांगलेच बस्तान बसवले होते. वेगवेगळ्या राजकीय मंडळी सोबत त्याचा सातत्याने वावर असत. सावरकर नगर येथील अभ्यासिका महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत असूनही एरंडे याने येथे स्वतःच्या मालकीची असल्याप्रमाणे कब्जा मिळवला होता.  राजकिय मंडळी सोबत वावरताना येथे असलेल्या ग्रीन जिमचा विकास केला. या ग्रीन जिम साग ताबा देखील स्वतःकडे असल्यासारखा तो वागत असल्याचे नागरिक आता बोलत आहेत. गरजू महिलांची अशा पध्दतीने त्याने पिळवणूक केल्याचे प्रकार उघड झाल्याने त्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

2 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

15 minutes ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

51 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

1 hour ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

23 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

23 hours ago