जिल्ह्यात सरासरीच्या 64.8 टक्के पाऊस

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात जूनपासून 2 सप्टेंबरपर्यंत 605.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या
कालावधीतील जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमानाची अपेक्षा 933.8 मिलिमीटर आहे.
आतापर्यंत प्रत्यक्ष झालेला पाऊस सरासरीच्या 64.8 टक्के आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीलाच जिल्ह्याच्या सरासरी पावसात सुमारे 35.2 टक्क्यांची तूट असल्याचे पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्यात 601.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या कालावधीतील सरासरी 750.2 मिलिमीटरच्या तुलनेत 80.2 टक्के पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत जिल्ह्यात 3.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सप्टेंबरची सरासरी 12.2 मिलिमीटर आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस
तालुकानिहाय आकडेवारीत त्र्यंबकेश्वर तालुका पावसात आघाडीवर आहे. जूनपासून आतापर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये 2,261.5 मिलिमीटर पाऊस झाला. तो तालुक्याच्या सरासरीच्या 118.9 टक्के आहे. दिंडोरीत 665.4 मिलिमीटर म्हणजे 123 टक्के, तर निफाड 440.7 मिलिमीटर म्हणजे 133.1 टक्के पाऊस झाला आहे. बागलाणमध्ये 421.9 मिलिमीटर म्हणजे 118.8 टक्के, नाशिक 637.7 मिलिमीटर म्हणजे 114.4 टक्के आणि कळवणला 544.4 मिलिमीटर म्हणजे 109.9 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. चांदवड 417.1, देवळा 317.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन्ही तालुक्यांनी अनुक्रमे 103.2 व 103.5 टक्के सरासरी गाठली आहे. सिन्नरला 357.9 मिलिमीटर पाऊस झाला असून, तो सरासरीच्या 94.5 टक्के आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांत मात्र पावसाची मोठी तूट कायम आहे. इगतपुरीत जूनपासून आतापर्यंत 1,167.8 मिलिमीटर पाऊस झाला असला, तरी तालुक्याच्या मोठ्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत तो केवळ 43.8 टक्के आहे. पेठमध्ये 1,263.8 मिलिमीटर म्हणजे 73 टक्के, मालेगाव 259.3 मिलिमीटर म्हणजे 74.9 टक्के आणि नांदगाव 274.5 मिलिमीटर म्हणजे 76.3 टक्के पाऊस झाला आहे.

The district received 64.8 percent of the average rainfall.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *