नाशिक

मॉन्सूनच्या पहिल्याच पावसदाण

नालेसफाईचे पितळ उघडे; सखल भागांत पाणीच पाणी

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने शहरात मुक्काम ठोकून झोडपून काढले आहे. राज्यात यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन झाले. बुधवारी (दि.28) मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने नाशिकमध्ये दमदार हजेरी लावत एक तास जोरात बॅटिंग केली. दरम्यान, महापालिकेच्या अपुर्‍या नालेसफाईचा फटका पुन्हा एकदा शहरवासीयांना बसला. अनेक ठिकाणी चेंबर्समधून पाण्याचा निचरा होत नसल्याने ते ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवरून वाहन होते. पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने सखल भागांत पाणी साचल्याने त्यास तळ्याचे स्वरूप आले. सराफ बाजार, दहीपूल, मेन रोड परिसरातील व्यावसायिकांची कमालीची धांदळ उडाली.

शहरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचत असून, वाहतूकही विस्कळीत होत आहे. बुधवारी (दि. 28) उपनगरांसह मध्यवर्ती भागात पावसाची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. पावसामुळे शहरातील महापालिकेच्या नियोजन आणि व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. बुधवारी अनेक ठिकाणी पाणी साचले, रस्ते जलमय झाले आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या पावसाने महापालिकेच्या तयारीची पोलखोल झाली आहे. नालेफाई आणि इतर उपाययोजना व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विशेषत: काही ठिकाणी नालेसफाई करूनही त्या भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. महापालिकेने नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आणि पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन योजना तयार करणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत पावसामुळे नागरिकांची सोय आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने महापालिकेने उपाययोजना करण्याची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापन अहवाल सादर केला असला, तरी त्यानुसार काम होणे आवश्यक आहे.
दरम्यान, पावसामुळे नाशिक शहरातील महापालिकेच्या नियोजन व व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत.

पावसाचे पाणी रिक्षात येत असल्याने त्यापासून बचावासाठी प्रवाशाला अशा प्रकारे छत्री उघडून बसावे लागले.

दिंडोरी रोड येथे चेंबर नादुरुस्त असल्याने पावसाचे पाणी अशा प्रकारे साठून राहते. विक्रेत्यांना साचलेल्या पाण्यातच दुकान मांडावे लागते.
दिंडोरी रोड ः लोकसहकारनगरमधील शांतीनगर वसाहतीत घराभोवती साचलेले पावसाचे तळे.

वीजपुरवठा खंडित

मे महिन्यात नागरिकांना शेकडो वेळा वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे.

त्यातच बुधवारीदेखील सकाळी अकराच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सीबीएस,

रेड क्रॉस सिंग्नल, नाशिकरोड, पंचवटी, म्हसरूळ आदींसह काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याचे

नागरिकांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मनपा आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असताना अतिरिक्त

आयुक्त करिष्मा नायर यांनी काही दिवसांपूर्वी पावसाच्या

पाण्यामुळे पाणी साचलेल्या भागांत जाऊन पाहणी केली होती.

त्यावेळी त्यांनी पाणी साचणार नाही, तसेच ब्लॅक स्पॉटवर काम

करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले होते. मात्र, तरीही

शहरातील अनेक भागांत पाणी साचतच असल्याचे चित्र आहे.

 

पन्नास किलोमीटर नाल्यांची सफाई

शहरात एकूण 121 किलोमीटर नाल्यांची सफाई मोहीम बांधकाम

विभागाने हाती घेतली आहे. आतापर्यंत 50 किलोमीटर नाल्यांची

सफाई झाली आहे. शहरात तीन लाख 69 हजार मीटर लांबीचे पाइप

असून, त्यावर 13 हजार 946 चेंबर आहेत. नाल्यांच्या सफाईसह

चेंबरच्या कामासाठी यंदा निविदा न काढता त्या-त्या विभागातील कामे

ठेकेदारांकडून सुरू केली आहेत. यासाठी प्रत्येक प्रभागासाठी पन्नास

लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

19 hours ago

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे

नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…

20 hours ago

दहापट पैसे कमवायला गेली…खेळण्याचे पैसे घरी घेऊन आली

शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…

2 days ago

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला   शहापूर :  साजिद शेख एका…

3 days ago

आलिशान कारच्या काळ्या काचाआड दडले होते काय? पोलिसांनाही बसला धक्का!

अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…

3 days ago

उज्ज्वल निकम होणार खासदार

उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…

3 days ago