आम्हाला गर्भसंस्कार करायचं आहे, अशी इच्छा घेऊन अनेक गर्भिणी रुग्ण क्लिनिकला येतात. पण मुळात गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? का करावे? ते कधीपासून करावे? आयुर्वेदात गरोदरपणात काही उपचार केले जातात का? अशा अनेकविध शंका असतात.

शरीरशुद्धीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर बीजाची ताकद वाढविण्यासाठी आयुर्वेदशास्त्र शक्ती व ओजवर्धक औषधे, तसेच आहारविषयक मार्गदर्शन करते.
आयुर्वेदशास्त्रात सप्तधातूचा विचार केलेला आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र क्रमशः हे सात धातू. रस धातू किंवा आहार रस म्हणजे जे अन्न आपण घेतो ते कोणत्या प्रकारचे आहे, कशा पद्धतीने आपण घेतो, कोणत्या वातावरणात घेतो त्यावर त्या पुढील प्रत्येक धातूचे पोषण व त्याची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणूनच आहार, निद्रा, ब्रह्मचर्य यांना शरीराचा आधार म्हटलं आहे.
शुक्र हा सातवा आणि शेवटचा धातू असून, शक्ती व प्राण यांचे अधिष्ठान आहे. हा पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये एक असतो. पुरुषाच्या शरीरात वीर्य शुक्रधातूपासून तयार होते. स्त्रीशरीरातील बीजांड निर्मितीसाठी शुक्रधातूच कारण असतो. उत्तम वीर्य म्हणजे शुक्राणू, तसेच उत्तम बीजांडे या दोन्हींसाठी संपन्न शुक्रधातूची आवश्यकता असते.
शुक्रधातूचा संबंध कफदोषाशी आहे. कफ पोषक आहार-विहार शुक्रधातूच्या वाढीसाठी पोषणासाठी आवश्यक आहे. आहारात दूध, तूप, लोणी, खडीसाखर, काळे मनुके, खारीक, अंजीर, बदाम, गोडांबी, खसखस वगैरे सात्त्विक व शुक्रधातूपर्यंत पोचून शरीरशक्ती वाढविणार्‍या द्रव्यांचा समावेश असावा.
मसद्यः शुक्रकरः पयः अर्थात, दूध हे शुक्रधातूची लगेच वृद्धी करणारे आहे. दूध धातूवर्धक, बलवर्धक, वीर्यवर्धक, तारुण्यवर्धक आणि शरीराला मजबुती देणारे आहे. म्हणून रोज दूध हे अधिक उपयुक्त ठरते.
पुरुषांनी मधुर औषधांनी सिद्ध तूप व दुधाचे सेवन करावे, तर स्त्रीने उडीद व तीळतेलाचे सेवन करावे.
रोजच्या जेवणात तुपाचा वापर करावा. शुक्रवृद्धीकरिता किमान रोज दोन चमचे तूप वापरावे. जेवण फक्त चव किंवा आवडी-निवडीचा विचार करून नाही, तर संतुलित शरीरद्रव्यांनी युक्त, प्रकृतीला अनुरूप व सात्त्विक असावे.
स्त्रियांना पाळीमुळे दर महिन्याला रक्तक्षय होत असल्याने रक्तधातूच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते. खजूर, काळे मनुके, पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या, भिजवलेले अंजीर यांचा स्त्रियांच्या आहारात अवश्य समावेश असावा. याबरोबरच आवळा, द्राक्ष, डाळिंब हेसुद्धा रक्तधातू वृद्धीसाठी उपयोगी ठरतात.
शुक्रावरच शरीराची महत्त्वाची अनेक कार्ये अवलंबून असतात. त्यामुळे औषधांच्या योग्य योजनेबरोबरच ज्या शुक्रधातूचा र्‍हास होण्याचा धोका असतो अशा चिंता, शोक, अनावश्यक चिडचिड, निराशा या मानसिक ताणतणाव वाढविणार्‍या गोष्टी टाळून शारीरिक आरोग्यासोबत मानसिक स्वास्थ्यसुद्धा सांभाळणे उत्तम.
आहाराइतकीच महत्त्वाची आहे औषध योजना. सर्वांना माहीत असणारा आणि वापरला जाणारा शतावरी कल्प स्त्रियांसाठी उत्तम आहेच. पण त्यासोबत इतर आवश्यक औषधी आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी.  – डॉ. अश्विनी कोन्नूर आयुर्वेदिक सल्लागार

 

Editorial Team

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

16 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

35 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

42 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

51 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

59 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago