नीलम गोर्हे यांचा शिंदे-भाजप सरकारवर आरोप
राज्यात ‘बये दार उघड’ मोहीम
शिवभोजनाच्या बिलांची अडवणूक
महापालिकांत भगवाच फडकणार
नाशिक : प्रतिनिधी
राज्यात वेदांत प्रकल्प न आणता तो गुजरातमध्ये गेला. मात्र एवढा मोठा प्रकल्प राज्य शासनानेच गुजरात राज्यासाठी पाठविण्याचे केल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी केला आहे. राज्यात नव्याने पालकमंत्री नेमण्यावरुन त्यांनी निशाणा साधत एकेका मंत्र्याकडे सहा-सहा जिल्हयांची जबाबदारी दिली आहे. याच्याने विकास कसा होणार असा सवाल केलो. राज्यातील या परिस्थितीमुळे प्रशासनसुद्धा गोंधळलेल्या अवस्थेत बघावयास मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी किमान नगरविकास विभागाच्या कामांना तरी गती द्यावी.
शिवसेना महिला आघाडीच्यावतीने राज्यातील 61 मंदिरांमध्ये जावून बये दार उघड ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामाध्यमातून महिला सबळीकरण आणि राज्याचा विकास या विषयी देवीकडे मागणी करण्यात येणार आहे.े. त्यानुसार गोर्र्हे यांनी चांदवड व वणी येथील देवीच्या दर्शनासाठी त्या आल्या असता नाशिकमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, दसर्याला शिवसेनेचा मेळावा दरवर्षीप्रमाणेच होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात राज्यातील सर्व महापालिकांवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार असाही दावा त्यांनी केला. तसेच सध्याच्या सरकारकडे कोणत्याही प्रश्नावर बोलण्यासारखे काही नाही, राज्यात शाश्वत विकासही राहिलेला नाही. राज्यातील महिलांवर अत्याचार होत असून महागाई, गॅसचे दर गगनाला भीडले आहे. राज्यातून वेदांतासारखे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचे प्रकार सुरु आहे. सत्ताधार्याना सत्ताच हवीच असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान त्यांनी राज्य शासनाला केलेे.यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नंदुरबारसह विविध ठिकाणी झालेल्या आदिवासींवरील अन्यायाबाबत आवाज उठविला असल्याचे सांगितले. मात्र यामध्ये पोलीसांवर दबाव असल्याने कोणतीही ठोस भुमिका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र राज्य हळूहळू बिहार प्रमाणे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. भाजपाकडून कायमच बेताल वक्तव्य करून जनतेची दिशाभूल केलीे. त्याचबरोबर शिवभोजनचे ठेकेदारांचे बीले अडवून शिवसैनिकांचे मनोधर्य कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु शिवभोजन काही शिवसैनिकांनीच सुरु केले आहे. असे नाही तर त्यात गोरगरीब सुद्धा आहेत.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…