शातील गोरगरीब, वंचित, पीडित, शोषित व दलित समाजातील शूद्र व अतिशूद्र प्रवर्गातील लोकांना न्याय, समता, बंधुता आणि मानवता मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले पूर्ण आयुष्य बहुजन जनतेच्या कल्याणासाठी व भल्यासाठी अर्पण केले. केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर या देशात रक्तविरहित सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजनैतिक क्रांती करून दाखवली आहे.
बाबासाहेबांना वर्गात बसून शिकायला बंदी होती. त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावे लागले होते. तरीसुद्धा ते वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत होते. घरी लाइट नसल्यामुळे संध्याकाळी रोडच्या दिव्याखाली अभ्यास करून बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाचा पर्वत लीलया सर केला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर व सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब खूप शिकावेत म्हणून आर्थिक मदत केली. बालपणी बाबासाहेबांना जातीयतेचे विखारी चटके सहन करावे लागले होते. कुठे गाडीने जायचे म्हटले तर गाडीवान त्यांना गाडीत बसू देत नव्हता. शिक्षक बाबासाहेबांना जवळ येऊ देत नव्हते. त्यांचा गृहपाठ लांबूनच पाहायचे. वर्गातील मुले त्यांच्यापासून चार हात लांब राहायचे. तरीही बाबासाहेब त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आणि खूप अभ्यास करायचे.
अठरा तास अभ्यास व चिंतन करून बाबासाहेबांनी या जगात कोणीही शिक्षण घेतले नाही तेवढे शिक्षण घेऊन आणि अमाप पदव्या संपादन करून या देशातील तळागाळातील रंजल्या गांजलेल्या बहुजन समाजाला व गरिबीत खितपत पडलेल्या दुःखी, पीडित, शोषित, वंचित व मागासवर्गीय समाजाला भारतीय संविधान लिहून त्यांच्या न्याय्य हक्काची एकेक कलम घटनेच्या पानापानांत लिहून ठेवले. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून बहुजन समाजाला समता, बंधुता व मानवता प्राप्त करून दिली. त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समतेचे बीज पेरले आणि देशात समता व मानवता चांगल्या प्रकारे रुजली. त्यांंनी मनुस्मृती जाळून जगात सर्वोत्तम अशा भारतीय संविधानाची निर्मिती करून सर्व जातीधर्माच्या लोकांना समान अधिकार देऊन देशात समता, मानवता व बंधुता रुजवण्याचे काम केले आहे.
हिंदू स्त्रियांच्या भल्यासाठी व कल्याणासाठी लिहिलेले हिंदू कोड बिल संसदेत नामंजूर होताच कायदेमंत्रिपदाला लाथ मारणारे डॉ. आंबेडकर हे जगातील एकमेव व्यक्ती होते. दिवाळी बोनस, गरोदरपणात स्त्रियांना घरी बसून पगार, कामगारांना कामाचे बारा तासांवरून आठ तास करणारे एकमेव कामगारांचे नेते डॉ. आंबेडकर आहेत. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, असे ते नेहमी म्हणायचे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा लाखमोलाचा संदेश बहुजन समाजाला देऊन जागृत करण्याचे काम केले आहे. बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मागासवर्गीयांचे हक्क व अधिकार नाकारलेल्या मनुस्मृतीला डॉ. आंबेडकरांंनी जाळले. बाबासाहेबांनी जी व्यक्ती 18 वषार्ंची झाली आहे, त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देऊन त्यांचा सन्मान वाढवला. मग तो गरीब असो की श्रीमंत, झोपडीत राहणार असो की महालात, प्रत्येकाला मताचा अधिकार देऊन या देशातील मनुवादी व्यवस्था नाकारून लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली.
आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते असेसुद्धा बाबासाहेबांना म्हटले जाते. त्यांच्या अलौकिक कार्याला कोटी कोटी वंदन. या जग बदलणार्या महामानवाचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 ला झाले. शेवटपर्यंत तळागाळातील गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी दिव्यासम जळणारा दिवा कायमचा शांत झाला. दलितांना आधार देणारा आधारस्तंभ कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. गोरगरीब जनतेला सावली देणारा वटवृक्ष कायमचा उन्मळून पडला. बाबासाहेब केवळ दलितांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी समस्त भारतीयांसाठी भारतीय संविधान लिहून प्रत्येक जातीधर्माच्या लोकांना मूलभूत हक्क व अधिकार देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे काम केले आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकून गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी सर्वांत ज्ञानी व बुद्धिवान विद्यार्थी कोण? असा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात जगातील सर्वांंत बुद्धिवान व हुशार विद्यार्थी म्हणून डॉ. आंबेडकरांचे नाव आघाडीवर आहे. संपूर्ण जग बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखते. बाबासाहेबांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन! शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, उजाड रानी किमया केलीस मोठी, भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी!!
राज्यभरात शिक्षकांचे आंदोलन; अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा पुणे : टीईटी परीक्षेच्या विरोधात शुक्रवारी (दि. 5)…
नाशिक गारठले : गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटीचा…
चार महिन्यांत सातशे कोटी वसुलीचे मनपाला आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील करदात्यांकडील थकबाकीचा आकडा तब्बल…
भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; प्रतीकात्मक करवत, कुर्हाड जाळून निषेध नाशिक : प्रतिनिधी तपोवनातील वृक्षतोडीवरून महायुतीतच…
घोटी-त्र्यंबकेश्वर वाढीव रस्त्याचा प्रश्न; पोलिसांनी शेतकर्यांना घेतले ताब्यात घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील घोटी- त्र्यंबकेश्वर…
मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. जो कधी चुकतच नाही तो माणूसच नाही, असे म्हटले तर…