भोंदू वैद्यांचे वाढते प्रस्थ

– अशोक थोरात
आजार मोठा, झटपट आराम हे मोबाइलवर बघून शंभरात वीस फसतात. मोठ्या अपेक्षेने औषध मागवतात, पण गुण शून्य. वरून किमती न बोललेले. चाळीस-पन्नास टक्के सवलत हे गोंडस नाव देऊन फसवाफसवी सुरू आहे. कॅन्सर, गुडघेदुखी, हृदयाचे गंभीर आजार, मणक्यांचे आजार यांसह शेकडो आजारांवर औषधे गळ्यात मारून लूट सुरू आहे. लैंगिक समस्यांचे तर हजार उत्पादन व किंमत डोक्याच्या बाहेर. यात समजा दहा टक्के फसले तरी लाखो म्हणता म्हणता करोडो कमावले जातात. फायदा शून्य झाला तरी बोलायची सोय नाही. कारण सर्वच चोरीचा मामला असतो. गुपचूप मागवतात, गुपचूप गिळतात व बाटल्या संपतात, पण मनासारखे काहीच होत नाही. अलीकडे रक्तदाब, मधुमेह हे कॉमन आहे व त्यांचेच भोंदू जास्त झाले आहेत.

बागलाणच्या पश्चिम भागात, मुल्हेरपासून पश्चिमेस गुजरातपर्यंत व पिंपळनेरपासून कुडाशी, नवापूरपर्यंत अनेक वैद्य गावागावांत बसले आहेत. त्यांचे खबरे बागलाण, मालेगावसह सर्वत्र या वैद्यांचा प्रचार व प्रसार करीत असतात. यात हाडवैद्य जास्त. हाड मोडल्यावर मोडलेला भाग जुळवायचा व खट्ट बांधायचा. यात प्लॅस्टर बांबूच्या कामड्यांसह अनेक गोष्टी सुरू असतात व महिना, दोन महिने ते हाडाचा भाग पॅक बसला तर नैसर्गिक पद्धतीने जुळतो, ही पूर्वापारची पद्धतच आहे व अशा गोष्टी करून ते काही बाबतीत यशस्वी होतात. पण ते बघून वेगवेगळ्या आजारांचे लोक डॉक्टर महाग पडतो म्हणून यांचा आधार घेतात व खर्च वाया जातो. दुखण्याचा ञास सहन करावा लागतो. शेवटी अस्थिरोगतज्ज्ञच शोधावा लागतो व विषय मार्गी लागतो.
अशा लोकांकडे कॅन्सरसह सर्वच आजारांना उपचार होतात, पण चुकीची औषधे खाऊन आजार वाढतो व बरेच देवाघरी जातात. यांना कुणी बंधन घालतच नाही ही शोकांतिका आहे. आता दोन-तीन वर्षांपासून याच कोकणी पट्ट्यात कोणतेही औषध न देता सर्व आजार श्रद्धेवर चांगला करणारा बाबा अवतरला आहे. दर मंगळवारी तेथे जावेच लागते. अशा सोळा फेर्‍या माराव्या लागतात. येथे एक वजनदार आमदार जात होते व आमदार पण महती सांगत होते. बुद्धिमान डॉक्टर, वकील असे बडे बडे लोक येथे गर्दी करतात. सोळा महिने म्हणजे चार महिने कडक पथ्य पाळले नाही तर अंगलट येते, ही भीती घातली जाते. पण चार महिने सोळा चकरा. या चार महिन्यांच्या काळात कुणाच्या घरी पाणीसुद्धा घ्यायचे नाही. म्हणजे चार महिने घरचेच पाणी व अन्न केवढा त्याग. शेवटी आशेवरच जगून हे सहन करायचे पण चार महिने हा तमाशा करून अरे मूर्खात निघालो आम्ही, असे म्हणायची वेळ येत आहे.
महत्त्वाचे नॉनव्हेज बंद म्हणजे बंद, पण पाचव्या महिन्यात काहीच चांगला अनुभव न आल्याने मटण, मासे परत सुरू. यात वैद्यकीय क्षेत्रावरील अविश्वास काही लुटारू डॉक्टर म्हणून समाज हा मार्ग शोधतो, ही
वस्तुस्थिती आहे.

The Growing Influence of Quack Doctors

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *