इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला चढवून मध्यपूर्वेत युद्धाला तोंड फोडले. आपल्यावर हल्ला होईल याची कल्पना इराणला होतीच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जूनमध्येच इराणला तशी धमकी दिली होती. तरीही इराणचे नेतृत्व याबाबतीत गाफील राहिले. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची फुलप्रूफ योजना बनवली होती. या योजनेची इराणच्या गुप्तचर यंत्रणेला कुठलीही माहिती मिळाली नाही, हे इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयशच म्हणावे लागेल. त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुला खामेनी आणि त्यांचे अनेक विश्वासू लष्करी अधिकारी एकाच वेळी मारले गेले. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण आपल्याला सहज शरण येईल असे अमेरिकेला वाटले, पण झाले उलटेच. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण पेटून उठला. अमेरिकेला शरण जाण्यापेक्षा त्यांनी स्वाभिमानाने त्यांच्याशी लढण्याचे ठरवले. इस्रायल आणि अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवून त्यांनी इस्रायलच्या प्रमुख शहरांना लक्ष्य केले. इतकेच नाही तर आखातात ज्या ज्या देशांत अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, तिथे हल्ले सुरू केले. त्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढली. अमेरिका आणि इस्रायलनेही इराणच्या तेहरानसह प्रमुख शहरांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रांचा मारा सुरू ठेवला तरीही इराणने माघार घेतली नाही. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण शरण येईल आणि आपला सहज विजय होईल, अशा आविर्भावात असलेल्या इराण आणि इस्रायलला आठवडा होत आला तरी हे युद्ध थांबवता आले नाही. उलट युद्धाची व्याप्ती वाढली. ती इतकी वाढली की, खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध आणखी तीन ते चार आठवडे चालेल असे सांगावे लागले. जर हे युद्ध आणखी तीन ते चार आठवडे चालले तर त्याची झळ केवळ या तीन देशांना किंवा आखातातील देशांनाच बसेल असे नाही, तर संपूर्ण जगाला याची झळ बसेल. त्याची सुरुवातही झाली आहे. इराणने इंधनवाहू जहाजांसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. या सामुद्रधुनीतून फक्त चीनच्या जहाजांना जाण्यास परवानगी असल्याचे इराणने म्हटले आहे. इतर देशांच्या जहाजांनी जर या सामुद्रधुनीत प्रवेश केला तर जहाजांवर हल्ला करेल, अशी धमकी इराणने दिली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी इंधन वाहतूक करणार्या जहाजांसाठी खूप महत्त्वाची सामुद्रधुनी आहे. आखाती देशांतून इतर देशांना होणारा तेलपुरवठा याच समुद्रधुनीतून होतो. जर ही सामुद्रधुनी बंद झाली तर संपूर्ण जगात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होईल. परिणामी, संपूर्ण जगावर मोठे संकट कोसळेल. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज दोन कोटी बॅरल इंधनाची वाहतूक
केली जाते.
तसेच कतार आणि यूएई या अरब देशांतून नैसर्गिक वायूची निर्यातदेखील केली जाते. इराणच्या या कारवाईमुळे या सागरी क्षेत्रातून होणारी इंधनाची वाहतूक खंडित झाली असून, जागतिक पुरवठा साखळी संकटात सापडली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर 72 डॉलर इतके होते. आता ते 81 डॉलरपर्यंत पोहोचले. जर हे युद्ध आणखी काही दिवस असेच सुरू राहिले तर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरवर पोहोचतील, असे जाणकार सांगत आहेत. याचाच अर्थ हे युद्ध जरी आखातात सुरू असले तरी त्याची झळ संपूर्ण जगाला बसू शकते. तेलाचे दर वाढले की, महागाई वाढते हे असे अर्थशास्त्र सांगते. त्यामुळे भविष्यात महागाईचा आगडोंब उसळू शकतो. याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपणे हेच जगाच्या हिताचे आहे. हे युद्ध लवकर संपावे यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न करायला हवेत. युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करायला हवा. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतीसेना पाठवून हे युद्ध रोखायला हवे. हे युद्ध जर वेळीच थांबले नाही तर कदाचित जग तिसर्या महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल आणि त्यात संपूर्ण जग होरपळून निघेल.
The Gulf War shook the world
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…