नाशिक

वाहतूक कोंडीवर पर्यायी मार्ग सुरू करावा

नगरसेवक समदडिया : उपाययोजनेसाठी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

येवला ः प्रतिनिधी
धुळे- मालेगाव- मनमाड-येवला – नगर या महत्त्वाच्या महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे दररोज कोंडी होत आहे. या सतत वाहतूक कोंडीचा मोठा फटका येवला शहरासह परिसरातील नागरिकांना बसत आहे. अवजड वाहनांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याने धुळे-सोलापूरदरम्यान अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरू करावा, अशी मागणी नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांनी केली आहे.
पूर्वेकडे नाशिक, पश्चिमेकडे छ. संभाजीनगर, दक्षिणेकडे अहिल्यानगर तर उत्तरेकडे मालेगाव-धुळे अशा चार जिल्ह्यांच्या मध्यवर्ती असलेल्या येवल्याला मागील काही महिन्यापासून वाहतूक कोंडीने त्रस्त केले आहे. चार-पाच राज्यातून जड मालवाहतूक वाहने या मार्गावरून धावतात. पुणे, अहिल्यानगर, शिर्डीपासून पुढे येवलामार्गे मालेगाव, धुळे या जिल्ह्यांसह कर्नाटक आणि मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांची सुसाट वाहने चालणार्‍या महामार्गालाच रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या अभावामुळे अवकळा आली आहे. वाहनांची संख्या चारपट वाढली. त्या तुलनेत रस्ता तोकडा ठरत असल्याने वाहतूक कोंडी, अपघात होत आहे. मुळात इंदूर-धुळे-सोलापूर या मार्गाने अवजड वाहतूक नियमित सुरू होती. मात्र, कन्नड घाटात कामकाज सुरू असल्याने ही पूर्ण वाहतूक मालेगाव-येवला मार्गाने वळविली आहे. सोबतच नांदगाव ते शिऊर बंगला या मार्गाने वाहने जाऊन पुढे छत्रपती संभाजीनगरमार्गे सोलापूर महामार्गाला लागून पुढे जात होती; परंतु हाही महामार्ग बंद केला आहे. धुळे-सोलापूरदरम्यान एकाच वेळी दोन महामार्ग बंद असल्याने संपूर्ण वाहतुकीचा ताण धुळे-मालेगाव-येवला-अहिल्यानगर या मार्गावर पडला आहे. वाहनांची वाढती संख्या, जड वाहतूक यामुळे या मार्गावर दररोज तासन्तास वाहनांच्या रांगा लागत आहेत. यावर उपाय म्हणून वाहतूक तज्ज्ञ, नागरिक व सामाजिक संघटनांनी पर्यायी मार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी कोंडी आणि ससेहोलपट टाळण्यासाठी कन्नड घाट व नांदगाव शिवूर बंगला हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात अवजड वाहनांसाठी सुरू करण्याची गरज आहे. रस्त्याचे काम सुरू असले तरी एकेरी वाहतूक शक्य असल्याने त्या भागातून छोटे मोठे ट्रक व कंटेनर वाहतूक सुरू करण्याची
गरज आहे.

Alternative routes should be introduced to address traffic congestion.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago