आस्वाद

इडलीपुराण

इडली हा शब्द मुळात कुठून आला काय माहीत? पण ’इटली’. नंतर काय फेमस असेल तर ती इडलीच…इडली मूळ दक्षिण भारतातील. हा एक मुख्य लोकप्रिय पदार्थ. पौष्टिक व पचायला हलका असा. तितकाच चांदोबासारखा गोल, पांढराशुभ्र व मऊ. जितका मुंबईचा वडापाव, महाराष्ट्रातली पुरणपोळी, नाशकातील मिसळ. पुण्याची बाकरवडी.. तितकीच लोकप्रिय. नाश्त्याला खायला कोणता पदार्थ योग्य तर दर आठवड्यात कधी ना कधी बनणारा! तांदूळ, उडदाची डाळ भिजवून दळून खायला केलेला सोपा पदार्थ, ना तळणं, ना भाजणं, ना मळणं, खायला व करायलाही फारसा त्रास न होणारी ही इडली! तिचा उगम खरंतर इंडोनेशियात झालाय, पण केरळ, तामिळनाडूतही इडली… छान मऊ, पांढरे शुभ्र, नाजूक आणि हलकीशी.. खाताना आपण किती खातो याचं भान होऊ न देणारी… काही बेभान करणारी.. प्रत्येक ठिकाणच्या इडल्या किती वेगवेगळे आणि विभिन्न.. मस्त केळीच्या हिरव्यागार पानावर पांढरीशुभ्र इडली, हिरवी चटणी आणि तांबूस सांबारसोबत विराजमान होते. आणि खाणार्‍याचा आत्मा तृप्त होतो.. इडलीवर सार्‍यांचं प्रेम, डायबिटीस, बीपी कुठल्याही आजाराशी तिचं जमतं. आपल्या मूळप्रमाणे इडली खुलत जाते, इडलीचे पीठ आंबवून यापासून ती पात्रातून बाहेर काढण्यापर्यंत तिची प्रोसेस असते.
मस्त कोथिंबीर आणि मिरची, खोबरे, जिरे घालून तयार केलेली झणझणित फोडणीची चटणी तिची लज्जत वाढवते. तसंच खोबरं, टोमॅटो, भोपळा, शेंगा घालून केलेलं सांबारही त्या खाण्यातला आनंद अधिक वाढवतो. हल्ली साध्या टपरीपासून ते उडपी हॉटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रसिद्ध असलेला पदार्थ… पार घराघरापासून कार्यालयातसुद्धा पोहोचला. सकाळी आठलाही ताजा असलेला आणि बारमाही असलेला….
एखाद्या उडप्याच्या हॉटेलमध्ये आठ वाजता असलेला अगरबत्तीचा सुगंध आणि इडलीचा सुवास सगळीकडे दरवळतो. आणि मग खाणार्‍यांची मैफल रंगते! इडली वडा, इडली सांबार, ग्रीन इडली, हल्ली मिक्स इडली, रवा इडली, पोडी इडली, थट्टेे इडली, मसाला इडली इतके सारे प्रकार आहेत. कशातही ती मिक्स होते. मग तिच्याबरोभर तिथं मोठं भावंडे आहेत…. डोसा, उत्तप्पा, वडा, आप्पे सारे सजून येतात.. पण तरी त्यातील इडली भाव खाऊन जाते. तिला काळ-वेळेचं बंधन नाही. सकाळ, दुपार, सायंकाळ केव्हाही खा ताजीच. दीर्घकाळात तोंडावर चव ठेवणारी आणि ताजीतवानी खाल्ल्याचं समाधान देणारी…. हल्ली ट्रॅव्हलिंगमध्ये चार इडल्यांचे पाकीट व मसाला इडली वेळ निभावून नेते. तामिळनाडूतून आलेला हा दाक्षिणात्य पदार्थ कधी आपला झाला आणि आपण त्याचे कधी झालो हे कळलंही नाही! लहानांपासून वृद्धांपर्यंतचा लाडका. माझ्या खूप आठवणी या रविवारच्या इडलीशी निगडित आहेत!
वरणगावला लहानपणी एक मद्रासी आँटी पाट्यावर इडलीचे पीठ वाटून विकायच्या. आम्ही बरोबर नऊ वाजता इडली घेण्यास जायचो आणि तो डबा दिवसभर पुरवायचो… त्यासोबत आईने केलेली हिरवीगार तिखट चटणी आणि तिच्या हातचा आंबट-गोड सार! आहा समोर टीव्हीवर रामायण.. हे सगळे इडलीने गाजवले. मध्यंतरी केरळ, मुन्नारला भटकंतीत याच इडली-रस्स्मवर ताव मारला. माझ्या बाबांची आवडती मैत्रीण ही इडली यावर त्यांच्यासाठी लिहिलेला हा लेखनप्रपंच… इडली एक मैत्रीण….

The Idli Saga

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago