पंतप्रधान मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा; भारतीय रेल्वेने गाठला ऐतिहासिक टप्पा
नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय रेल्वेने शुक्रवारी एक ऐतिहासिक टप्पा गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधील जींद रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत डिझाइन आणि विकसित केलेली ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या तंत्रज्ञानावरील संपूर्ण बौद्धिक संपदा हक्क भारताकडेच असल्याने, भविष्यात हे स्वदेशी तंत्रज्ञान इतर देशांना निर्यात करण्याचीही क्षमता भारताने सिद्ध केली आहे.
ही पहिली हायड्रोजन ट्रेन जींद ते सोनीपत या 89 किलोमीटर अंतराच्या मार्गावर धावणार असून, ती जास्तीत जास्त 75 किमी प्रतितास वेगाने प्रवास करेल. या ट्रेनमध्ये एकाच वेळी सुमारे 2,600 प्रवाशांची क्षमता असून, ती अत्याधुनिक प्रोटॉन एक्सचेंज मेंब्रेन फ्यूएल सेल तंत्रज्ञानावर चालते. या तंत्रज्ञानात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजनच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्माण केली जाते आणि या प्रक्रियेत केवळ पाण्याची वाफ व उष्णता बाहेर पडते, ज्यामुळे ही गाडी पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि शून्य कार्बन उत्सर्जन करणारी ठरते.
जगातील मोजक्या प्रगत देशांच्या पंक्तीत
या हायड्रोजन ट्रेनच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत आता जर्मनी, अमेरिका, जपान आणि चीनसारख्या हायड्रोजन ट्रेन चालवणार्या जगातील मोजक्या प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये पूर्णपणे भारतीय बनावटीची ही ट्रेन तयार करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यामध्ये हायड्रोजन गळती आणि आग ओळखणार्या अत्याधुनिक सेन्सर्ससह अनेक अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आणि देशाच्या 2070 पर्यंतच्या नेट-झीरो कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टांना बळ देणारी ही ट्रेन, भविष्यातील स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त रेल्वे प्रवासाची नांदी ठरली आहे.
The country’s first indigenous hydrogen train enters passenger service.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…