प्रशासनाला उपरती, स्वच्छतेसाठी 80 कर्मचार्यांंचा ठेका
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरीसह उपनद्यांमधील प्रदूषणामुळे नाशिक महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याची कबुली स्वतः प्रशासनाने देत, यावर उपाययोजनेकरिता 80 कर्मचार्यांची स्वच्छतेकरिता नियुक्ती केली जाणार आहे. मनपा हद्दीत गोदावरी नदीची लांबी 20.50 किलोमीटर, तर नंदिनीची लांबी 15 किलोमीटर आहे.
प्रशासनाने यासाठीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. दरम्यान, मनपा हद्दीतील गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या (वालदेवी, वाघाडी, कपिला, नंदिनी व इतर) 100 फूट दोन्ही तीरांवरील परिसर साफसफाई व स्वच्छ ठेवणे, तसेच नदीपात्रात वाढणार्या पाणवेली, पाणगवत, प्लास्टिक, केरकचरा साफसफाई करण्यासाठी 80 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार आता तरी महापालिका ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, मनपा हद्दीतील गोदावरी नदी व तिच्या उपनद्या स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनपा हद्दीतील गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांच्या 100 फूट दोन्ही तीरांवरील परिसर साफसफाई ठेवण्यासह नदीपात्रात वाढणार्या पाणवेली, पाणगवत, प्लॉस्टिक, केरकचरा साफसफाई ठेवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वाढत्या प्रदूषणामुळे देश-परदेशातून येणार्या पर्यटकांसमोर नाशिक महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. गोदावरी नदीच्या उपनद्या वालदेवी, वाघाडी, कपिला व नंदिनी या नद्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती व झोपडपट्ट्या असल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांकडून घाण, कचरा व निर्माल्य टाकले जात असल्याने परिसरात डास, दुर्गंधी व रोगराई निर्माण होते. शहरातील गोदावरी नदी व लगतच्या ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी दररोज असंख्य भाविक पंचवटी परिसरात येतात. गोदावरी नदीलगतच्या परिसरातच निर्माल्य, तसेच इतर सामग्री टाकली जात असल्याने नद्यांचे प्रदूषण वाढत होत आहे. या नद्यांमधील स्वच्छतेसाठी यापूर्वी मान्यता देण्यात आलेले 60 व वाढीव 20 असे एकूण 80 अकुशल कर्मचार्यांचा सुधारित प्रस्ताव महासभेवर सादर केला आहे.
असे असेल नियोजन
गोदावरी मनुष्यबळ – 35
वालदेवी नदीसाठी – 06
नंदिनी नदी – 15
वाघाडी नदी – 08
कपिला नदी – 06
इतर उपनद्यांसाठी – 10
एकूण कर्मचारी – 80
The image of the Municipal Corporation is tarnished due to pollution in the Godavari River in the city.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…