राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

महिला आरक्षणाला पाठिंबा, परिसीमनला तीव्र विरोध?

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी विरोधकांची एकजूट

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, केंद्र सरकारने महिला आरक्षणाची अंमलबजावणी ’मतदारसंघांची पुनर्रचना’ (डिलिमिटेशन) आणि ’जनगणने’शी जोडल्याने विरोधकांनी याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून सुरू होणार्‍या संसदेच्या विशेष अधिवेशनात या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच संमत झाले असून, ते संविधानाचा भाग आहे. मात्र, सध्या सरकार जे प्रस्ताव आणत आहे, त्याचा महिला आरक्षणाशी संबंध नसून तो ’डिलिमिटेशन’च्या नावाखाली सत्ता बळकावण्याचा आणि जागांच्या फेररचनेचा (जेरी-मँडरिंग) प्रयत्न आहे.
राहुल गांधी म्हणाले, की आम्ही ओबीसी, दलित आणिआदिवासी समाजाची ’हिस्सा चोरी’ होऊ देणार नाही. जातीय जनगणनेच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून घेतलेला कोणताही निर्णय या वर्गांवर अन्यायकारक ठरेल. लहान आणि दक्षिण भारतीय राज्यांचे नुकसान: लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी लोकसंख्येचा निकष लावल्यास दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि लहान राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होऊन त्यांच्यावर अन्याय होईल, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. जातीय जनगणनेची मागणी: जोपर्यंत नवीन जातीय जनगणना होत नाही, तोपर्यंत ओबीसी महिलांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असा दावा काँग्रेसने केला आहे. आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघांच्या पुनर्रचनेची वाट पाहण्याची गरज नाही, ते तातडीने लागू करावे, अशी मागणी विरोधकांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केली.

विशेष अधिवेशन व पुढील दिशा

आज(दि. 16)पासून सुरू होणारे तीन दिवसीय विशेष अधिवेशन केवळ महिला आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, सरकारने ’डिलिमिटेशन बिल’चा घाट घातल्यास संपूर्ण ’इंडिया’ आघाडी या विधेयकाविरोधात मतदान करेल, असा निर्धार विरोधी पक्षांनी व्यक्त केला आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago