आस्वाद

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्यांच्या पालकांचा या गोष्टीसाठी त्यांना पाठींबा होता. समस्त स्त्रीवर्गासाठी आणि पालकांसाठीही खाली मान घालायला लावणारी ही घटना आहे. बलात्काराच्या काही केसेसमध्ये तर दुसर्‍या स्त्रियाच कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर स्त्री माजघरातून बाहेर पडली. शिकली, सवरली आणि प्रगतीच्या दिशेने पुढे जातच राहीली. मधल्या काळात नोकरी करता करता तिने घरादारालाही एकत्र बांधून ठेवले. भारतीय आदर्श एकत्र कुटुंबाची ती जागतिक प्रतिनिधीत्व करणारी होतीच. पण घर ऑफिस प्रगती या सगळ्याकडे वाटचाल करता करता प्रचंड थकतही होती. नकळत एकत्र कुटुंबाविषयी नकारात्मक भावना रादर तिरस्काराची भावना तिच्यात निर्माण झाली. याला कारणीभूत एकत्र कुटुंबातील इतर सदस्य; तिला आदर्शाच्या मखरात ठेवुन स्वतःचा स्वार्थ साधत त्यांनी तिला सगळ्यासाठीच गृहीत धरले. म्हणून तिच्या मनात नकारात्मकता आली आणि तीच भावना तिच्यातून पुढच्या पिढीत पर्यायाने समाजात संक्रमित झाली. एकत्र कुटुंबात आधी मने विभागली आणि विभक्त कुटुंब पद्धतीने संपूर्ण देशात व्यवस्थित हातपाय पसरवले. आणि बस्तानही बसवले. यात चूक कोणाची? चिंतनाचा विषय आहे. फॅमिली प्लॅनिंग करता करता कुटुंब इतके आक्रसले की मुले जाणती झाल्यावर आई-वडिलांना स्वतःच्याच घरात स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागली. मुलगा सून यांच्याशी जुळवुन घेतापेक्षा त्यांच्यापुढे नमते घेता घेता सासुरवासाचे रूपांतर सूनवासात कसे झाले समजलेच नाही. घटस्फोट हा भारतीय समाजाला लागलेला कलंक हल्ली कित्येक युवक-युवती सन्मानाने मिरवू लागलेले आहेत. घटस्फोटाची कित्येक कारणे तर हास्यास्पदच आहेत. कोर्टात कौन्सिलर असणारी माझी मैत्रीण या संदर्भात अनेक किस्से सांगत असते. अगदीच अलीकडचा किस्सा म्हणजे नवपरिणित दाम्पत्याला लाँग ड्राइव्हवर जायचे म्हणून नवर्‍याने बायकोला घरातून पाण्याची बाटली आणायला सांगितले. नवीन लग्न झालेल्या मुलीच्या घरी तिची आई आली होती. बायकोने सांगितले पाणी आपण रस्त्यात विकत घेऊ. त्याने तिला एक-दोनदा समजावून सांगितले की बिसलेरीच्या पाण्याचा मला त्रास होतो. पण ही ढिम्म. वाद विकोपाला गेला. बाल्कनीत उभे राहून गंमत बघणार्‍या आईने मुलीला परत घरात बोलावले. बॅग घेऊन दोन्ही मुलींच्या माहेरी रवाना झाल्या. यात पडती बाजू घ्यायला कोणीही तयार नव्हते. मुलाची खरेतर काही चूक नाही. पण मुलीच्या आईचे म्हणणे रस्त्यात साधी एक बिसलेरीची बॉटल घेऊ शकत नाही तो माझ्या मुलीला काय सुखी ठेवणार? आश्चर्य मुलाचे किंवा मुलीचे वाटली नाही, पण उद्वेगजनक संताप मात्र आईबद्दल झाला.
दुसर्‍या एका केसमध्ये नवर्‍याला फक्त वरणभाताचा कुकर लावता येतो. पोळ्या जमत नाही म्हणून! सकाळी दहा वाजता उठून आईच्या हातचा आयता चहाचा कप हातात घेणार्‍या मुलीने मुलाला अपुरुष आणि सासू-सासर्‍यांवर मानहानीचा दावा केला. असंख्य अशा केसेस आहेत ज्यावर नवरा आणि सासरच्यांवर बिनधास्त चुकीचे आरोप लावत लग्न बंधनातून मोकळे होत घटस्फोटाचा शिक्का माथी मानाने मिरवणार्‍या मुली आहेत. मैत्रिणीने एक केस तर अशी सांगितली एका फॅमिलीत चार मुली आहेत. साधारण अशा त्यांच्या नोकर्‍या आहेत. पूर्वी वन बीएचके फ्लॅटमध्ये राहणारे कुटुंब आता बंगल्यात राहत आहे. अचानक इतकी श्रीमंती येण्याचे कारण अचंब्यात टाकणारे आहे. चारही मुलींचे चार ते पाच लग्न झालेले आहेत आणि प्रत्येक लग्नानंतर प्रत्येक मुलीचा घटस्फोट झाला आहे. श्रीमंत वय वाढलेल्या गरजू मुलांशी लग्न करून एक-दीड वर्षात घटस्फोट घ्यायचा. पोटगी म्हणून प्रत्येक वेळेला लाखो रुपये उकळायचे. मोठीला मुलगापण आहे. म्हातारपणाची काठी म्हणून त्यांनी त्याची कस्टडी अगदी वाममार्गाने मिळवलेली आहे. त्याच्या पालनपोषणासाठी महिन्याकाठी काही हजार रुपये त्याच्या वडिलांकडून ही फॅमिली उकळवत असते. मनात हिशोब लावता लावता मीच थकले. आश्चर्य मुलींचे नाही त्यांच्या आई-वडिलांचे वाटले. त्याचबरोबर मुलाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन् देखील उभे राहिले. एकविसाव्या शतकात स्त्रीने शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. प्रगतीची यशोशिखरे पादाक्रांत करत करत तिने अवकाशातही भरारी घेतली. एकही क्षेत्र असे नाही जिथे तिने तिच्या प्रगतीचा झेंडा रोवला नाही. पाश्चात्यीकरणाचे वारे जसे आपल्या देशात वाहू लागले तसे काही विदुषींनी भारतीय उदात्त संस्कृती जपत जपत शिक्षणात भरारी मारली. प्रत्यक्षात पाश्चात्त्यांमध्ये राहूनही तिचे स्वत्व ती जपत राहिली.
पण ज्या स्त्रिया पाश्चात्य संस्कृतीतल्या मोकळेपणावर स्वतंत्र वागण्यावर भाळल्या त्यांनी मात्र त्याचा अर्थ स्वैराचार असा घेतला. डोईवरचा पदर खांद्यावर, खांद्यावरूनही खाली पडू लागला. साडीची जागा मॅक्सी, फ्रॉक ते पंजाबी ड्रेस, जीन्स-शर्ट आणि आता तर दिवसेंदिवस कपडे प्रचंड प्रमाणावर तोकडे होऊ लागले. संयमित वागणे बेताल होऊ लागले. थोरामोठ्यांच्या आदराची जागा तिरस्काराने घेतली. ज्यांनी जन्माला घातले, कुटुंबाचा आपल्या करिअरचा प्रगतीचा पाया घातला, जीवनाला सकारात्मक आकार दिला, प्रगतीची दिशा दिली, आपल्या ऐषोरामासाठी आयुष्य खर्ची घातले त्यांचीच अडचण होऊ लागली.
’बोल्ड’ या शब्दाची परिभाषा स्वातंत्र्यावरून स्वैराचाराकडे गेली. इतकी की, आपले ईप्सित साध्य करण्यासाठी चारित्र्य शील यासोबत आई-वडील, घरदार आणि स्वतःची देखील प्रतिष्ठा तिने पणाला लावली. शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक प्रगती ही व्याख्या कुटुंबाची तोडफोड करत लिव्ह इन रिलेशनशिप, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस, डायव्होर्स या अनिष्ट रूढींमध्ये बदलली. सुंदर आदर्श असे एकत्र कुटुंब न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये कन्व्हर्ट होत होत एकलपणाकडे जाते झाले. एकल मातांचे प्रमाण समाजात खुप वाढले.
वृद्धाश्रम, आधाराश्रम, अनाथाश्रम गल्ली बोळात बोकाळले. लग्नाचे वय प्रमाणाबाहेर वाढले. बोल्डनेसची, प्रगतीची व्याख्या तिला नव्याने समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वतःचा स्वाभिमान, चारित्र्य, शील जपतही प्रगती साधता येते, हे समजण्याची आणि येनकेन मार्गाने समजावण्याची आवश्यकता आहे. एकलकोंडेपणा स्वीकारत कोषात जाऊन किती प्रगती साधता येईल माहीत नाही? पण जितक्या यशस्वी स्त्री-पुरुषांच्या कथा ऐकल्या आहेत. त्यांनी समाजात राहत स्वतःबरोबर इतरांचीही प्रगती साधत अत्युच्च शिखरे गाठली आहेत. स्त्रीला स्त्रीच्या स्त्रीत्वाची जाणीव करून देण्याची गरज आहे.

Boldness and ‘she’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

13 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

13 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

13 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

13 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

13 hours ago

सत्यासत्यता मन जाणे । साक्ष देई अंतःकरण

मनाला सुन्न करणार्‍या अनेक घटना आपल्या आसपास सतत घडत असतात. एखादी गोष्ट अशी घडते कि…

13 hours ago