आस्वाद

अर्ध्यावरती डाव मोडला,पण…

एकटी अबला नारी काही करू शकत नाही. तिला आधाराची गरज असते, ही समाजाची मानसिकता, समज कामकाजातून आणि कष्टाच्या जोरावर खोटा ठरविला आहे. महिलेने ठरविले तर ती आकाशालाही गवसणी घालू शकते, असे महिरावणीच्या अश्विनी वाघ सांगतात.
2012 मध्ये लग्न झाल्यानंतर अश्विनी प्रवीण वाघ यांचे पती कामानिमित्त गावाला गेले होते, पण तिथे त्यांना सर्पदंश झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. पती गेल्यानंतर दुःखाचा डोंगरच कोसळला. माझ्या सोहम आणि पूर्वा या मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. गृहिणी होते. त्यामुळे बाहेरचे जग माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी. जगाचे व्यवहार माहिती नव्हते. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न ’आ’ वासून होता. मुलांना सांभाळायचे होते, पण सुरुवातीला काही मार्ग सुचत नव्हता. सुरुवातीला घरगुती जबाबदार्‍या आणि बाहेरच्या जगाचे अज्ञान यामुळे अवघड वाटले. बचतगट सुरू केला आणि गावातील महिलांच्या मदतीने, मेहनतीने स्वतःसाठी व्यवसायाची संधी निर्माण केली.
बचत गटाच्या माध्यमातून अश्विनी पंचायत समितीत निवडल्या गेल्या आणि त्यांच्यासोबत मेस/खानावळ व्यवसाय सुरू केला. एकल महिला म्हणून कुटुंब आणि व्यवसाय चालवणे कठीण आहे, पण वेळेचे नियोजन योग्य केले तर अशक्य काही नाही, अशा आश्वासक शब्दांनी त्यांनी इतर महिलांना प्रेरणा दिली. आज त्या फक्त एक यशस्वी उद्योजिका नसून, समाजासाठी प्रेरणास्रोेत आहेत. पती संसार अर्ध्या प्रवासात सोडून गेले असले, तरी अप्रत्यक्षपणे कायमस्वरूपी माझ्यासोबत आहेत. मला माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल घडवायचे आहे.

The innings broke down halfway through, but…

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago