नाशिक

कुंभमेळ्यामुळे नाशिक-त्र्यंपकचा चेहरामोहरा बदलणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध विकासकामांची पाहणी

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या कामांमुळे दोन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुढील 25 ते 30 वर्षांचा विचार करून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात असून, सर्व कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौर्‍यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आमदार हिरामण खोसकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. एस. व्ही. स्वामी, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, एमएसआयडीसीचे अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाट, नाशिक येथील द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळ येथे भेट देऊन विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि भविष्यातील नियोजनाचा आढावा घेत कामांची गती वाढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. पाहणीनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली कामे केवळ या सोहळ्यापुरती मर्यादित नसून, पुढील 25 ते 30 वर्षांच्या विकासाचा भक्कम पाया रचणारी आहेत. आधुनिक शहराच्या दिशेने वाटचाल करताना वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही कामे परिवर्तनात्मक ठरतील. पुढील टप्प्यात विमानतळाशी संबंधित विकासकामांनाही गती दिली जाईल.

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून विकास
महानगरपालिका, एमएसआरडीसी, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त समन्वयाने ही कामे सुरू आहेत. सर्व यंत्रणांनी एकत्र येत चालवलेल्या या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.

धार्मिक पर्यटनाला नवी दिशा
त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाट परिसरातील कामे आव्हानात्मक असली तरी ती नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत. देशभरातून येणार्‍या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने या सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

The Kumbh Mela is set to transform the face of Nashik and Trimbak.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

59 minutes ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

1 hour ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

1 hour ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

1 hour ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

1 hour ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

2 hours ago