पांढुर्ली उपबाजारात 9 हजार क्रेट्सची आवक, सरासरी दर 450 रुपये
सिन्नर : प्रतिनिधी
टोमॅटो विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ आणि शेतमाल विकल्यानंतर त्याच दिवशी रोख पैसे मिळण्याची सुविधा… अशा अपेक्षांसह सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजारात टोमॅटो लिलावाचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी रविवारी (दि.11) सुमारे नऊ हजार क्रेट्स टोमॅटोची आवक झाली. सरासरी 450 रुपये प्रतिक्रेट्स भाव मिळाला. शेतकरी संजय किसन पवार यांच्या 57 क्रेट्स टोमॅटोला 601 रुपये प्रति क्रेट्सचा उच्चांकी दर मिळाल्याने पहिल्याच दिवशी बाजारभावाने शेतकर्यांचे लक्ष वेधले.
बाजार समितीच्या उपसभापती सिंधूताई केशव कोकाटे यांच्या हस्ते लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे संचालक प्रकाश तुपे, जालिंदर थोरात, विकास वाजे, अनिल शेळके, सुनील चकोर, रवींद्र शेळके, गणेश घोलप, सचिव विजय विखे उपस्थित होते. शेतकर्यांची कुचंबणा आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी टोमॅटोची शेताच्या बांधावर किंवा शिवारमापाने विक्री न करता शेतमाल पांढुर्ली उपबाजार आवारातच विक्रीसाठी आणावा, असे आवाहनही बाजार समितीच्या संचालक मंडळाने केले. सचिव विजय विखे, दिलीप पाटोळे, रंगनाथ डगळे, अर्जुन भांगरे आणि राहुल पवार यांनी लिलावाच्या कामकाजात सहकार्य केले.
पांढुर्ली उपबाजारात सोमवार ते रविवार असे आठवड्यातील सातही दिवस टोमॅटोचे लिलाव सुरू राहणार आहेत. शेतमालाची विक्री झाल्यानंतर त्याच दिवशी शेतकर्यांना रोख स्वरूपात पैसे अदा केले जाणार आहेत.
खरेदीदार व्यापार्यांकडून पैसे मिळाले नाहीत, तर संबंधित शेतकर्यांनी बाजार समितीकडे तातडीने तक्रार करावी, असे आवाहन संचालक मंडळाने केले.
व्यापारी आणि शेतकर्यांची उपस्थिती
टोमॅटो खरेदीसाठी अनिल हारक, दत्ता हारक, शौकत बागवान, शौकत सरदार बागवान, बाळासाहेब दळवी, लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे दत्तू गडगे, अमोल खोल्लम, अण्णा हारक, निवृत्ती चव्हाणके, शालिमार ट्रेडिंग कंपनी, श्रीगणेश ट्रेडिंग कंपनी, संतोष जोशी, नितीन आरोटे, समाधान तुपे, दीपक डुंबरे, आतिक शेख, अंकित राहणे, समीर शेख, फिरोज शेख, सत्तार मलिक, मुन्ना घोलप, प्रगतिशील शेतकरी योगेश तुपे, बाळासाहेब भोर, रंगनाथ जाधव, मुरलीधर हारक, रघुनाथ बरकले, प्रभाकर हारक, सोमनाथ तुपे, विश्राम शेळके, सुकदेव वाजे, विलास हारक, विलास कातोरे, आनंदा तुपे, रोहिदास पवार, संजय दळवी, उत्तम वाजे, शिवाजी पवार आणि विष्णुपंत वाजे आदी उपस्थित होते.
Tomato fetches a price of ₹601 on the very first day.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…