नाशिक

जमिन वाटपाचा वाद विकोपाला पोचला अन पुढे घडले असे काही की….

जमिन वाटपाचा वाद विकोपाला पोचला अन पुढे घडले असे काही की….

दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील उमराळे खुर्द येथे भावा भावांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटप वादातून झालेल्या घटनेत भावाने भावाच्या पत्नी व सासू -सासर्‍यांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेत तिघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे संशयित आरोपीस दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शिवाजी नाथा शार्दुल व तानाजी नाथा शार्दुल रा. उमराळे खुर्द या दोन भावांमध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून वाद होता हा वाद दिंडोरी पोलीस ठाण्यात पोहचला होता दिंडोरी पोलिसांनी दोघा भावांना समज देत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र शनिवारी शिवाजी शार्दुल व त्यांच्या भावाची पत्नी वैशाली उर्फ कविता यांचेत वाद झाले वादाचे पर्यावसन हाणामारीत होत यात शिवाजी यांनी तानाजी ची पत्नी वैशाली वर तलवारीने हल्ला केल्याचे तानाजीने दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तानाजीच्या पत्नीस सोडविण्यास आलेले त्याचे सासू व सासरे माया व प्रकाश इंगोले रा. एकलहरे यांच्यावरही शिवाजी यांनी तलवारीने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे यात तिघेही गंभीर जखमी झाले तीनही जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे दिंडोरी पोलिसांनी फिर्यादीनुसार शिवाजी शार्दुल यांची पत्नी व मुलगा मुलगी यांचे वर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राखुंडे करत आहे.

the-land-distribution-dispute-reached-a-critical-point-and-something-happened-next

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago