नाशिक

पारा चढला, नागरिक घामाघूम

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील तापमानात वाढ झाली असून, एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात तापमानाने चाळिशी गाठली आहे. पुढील चार-पाच दिवस उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककरांच्या जीवाची काहिली होणार आहे. त्यामुळे कामाशिवाय, तसेच उन्हाच्या वेळा सोडून सकाळी किंवा सायंकाळी बाहेर पडण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

शहरात उष्णतेची लाट कायम असून, मंगळवारी, दि. 14 रोजी कमाल तापमान 39.3 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हवेतील आर्द्रता 54 टक्के राहिली आहे.दिवसेंदिवस तापमानात चढ-उतार होत असले, तरी उष्णतेची तीव्रता हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार आर्द्रता केवळ 23 टक्के इतकी राहिल्याने वातावरण कोरडे आणि उकाड्याचे जाणवत आहे. उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पर्याप्त पाणी पिणे, डोके झाकून बाहेर पडणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रविवारी शहराचे तापमान 32.5 अंश सेल्सिअस, तर सोमवारी 38.8 अंशांवर पोहोचले. मंगळवारी, दि. 14 किमान तापमान सकाळी 20 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.दुपारी कमाल तापमान 39.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
तापमानाचा पारा चढल्याने नागरिक भरदुपारी घामाने डबडबल्याचे चित्र होते. परिणामी शीतपेये, सावलीचा आधार घेत गारवा अनुभवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढता राहणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
जिल्ह्यात उष्णतेचा प्रभाव कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे, असा सल्ला दिला आहे.

अशी घ्या खबरदारी

या काळात दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे, शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे, हलका व सैलसर पोशाख करावा, तसेच डोके झाकून बाहेर पडावे. उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

the-mercury-has-risen-citizens-are-sweating-profusely

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago