डोके दुखत असल्याने अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल केले पण उघडकीस आले भलतेच

सिडको:  विशेष प्रतिनिधी

डोके दुखण्याबरोबरच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सातपूर येथील दवाखान्यात दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सहा आठवड्याची गर्भवती असल्याचे उघड झाले, त्यामुळे मुलीच्या आईसह सर्वांना च धक्का बसला. या मुलीच्या अज्ञानपणाचा कोणीतरी गैरफायदा घेऊन तिच्यावर कोणी लैंगिक अत्याचार केले याचा शोध घेतला जात आहे.

पीडित मुलगी सातपूर येथील कामगार रुग्णालयात डोकेदुखी असल्यामुळे, तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी दाखल झाली होती. दोन-तीन दिवस उपचार करूनही तिला त्रास होतच असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली असता ही पीडिता सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे समजले. फिर्यादी यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता ती घाबरल्याने काहीच बोलत नव्हती. नंतर महिला व बालकल्याण समितीच्या समुपदेशन कार्यकर्त्यांनी तिच्याकडे चौकशी केली; मात्र ती अत्याचार करणाऱ्याबाबत कोणतीही माहिती देऊ शकली नाही.हा प्रकार तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ऑगस्ट २०२३ ते दि. २८ एप्रिल २०२४ दरम्यान झाला असावा, असा संशय आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *