नाशिक: प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला, करंजकर यांनी आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिंदे गटात प्रवेश केला. करंजकर हे नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी प्रचार पण सुरू केला होता, परंतु ऐनवेळी ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली होती, यामुळे करंजकर यांनी लढणार आणि नडणार असे म्हणत उमेदवार म्हणून अर्ज भरला होता, यादरम्यान मातोश्री वर त्यांना बोलावण्यात देखील आले होते. परंतु त्यांची भेट ठाकरेशी झालीच नाही, शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, दादाजी भुसे यांनी करंजकर यांना शिंदे गटात आणत त्यांचा प्रवेश घडवूनआणला, त्यांना उपनेते पद तसेच नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख हे पद दिले आहेत, त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता गोडसे यांना दिलासा मिळणार आहे.