नाशिक

जन्माच्या वेदना मरणानंतरही सरल्या नाहीत…

रस्त्याअभावी मृतदेह घरातच; ग्रामस्थांचा रस्त्यासाठी संघर्ष

खेडलेझुंगे : वार्ताहार
पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही रस्त्याअभावी मृतदेह घरात ठेवावा लागतो, ही दुर्दैवी घटना शनिवारी निफाड तालुक्यातील कोळगाव-देवगाव परिसरात घडली. गावातील प्रकाश दत्तात्रेय घोटेकर (वय 39) यांचे निधन झाल्यानंतर स्मशानभूमीकडे नेण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने मृतदेह रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत घरातच ठेवावा लागला.
अखेरीस ग्रामस्थांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टरवरून अंत्ययात्रा निघाली आणि दुपारी 1 वाजता अंत्यविधी पार पडला. या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून सतत पाठपुरावा केला आहे. निवेदने दिली, उपोषणे केली; तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण केले होते. त्यावेळी काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष
आहे. “हा रस्ता शासनाच्या नोंदीत आहे की मुद्दामहून दुर्लक्षित केला जातो?” असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. ‘विकासाच्या गप्पा मारल्या जातात; पण प्रत्यक्षात अंत्ययात्रेलाही रस्ता नाही. मृत्यूनंतरही मृतदेहाला सन्मान मिळत नाही. हे शासनव्यवस्थेच्या अपयशाचेच प्रतीक आहे,’ अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. ‘मागील पंचवीस वर्षांपासून आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करत आहोत. तरीही प्रशासनाचे लक्ष नाही. जर पुन्हा अशीच दुर्दैवी घटना घडली तर पुढील वेळी अंत्यविधी थेट आमदारांच्या दारात करू,’ असा इशारा दत्तात्रय घोटेकर यांनी नागरिकांच्या वतीने दिला. त्यांच्या या शब्दांत केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण गावाचा संताप दाटून आलेला होता.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago