मंदिर हस्तांतरावरून गुरवांमध्ये वाद; कपालेश्वर मंदिरातील घटना
पंचवटी : प्रतिनिधी
कपालेश्वर महादेव मंदिराची देखभाल, पूजाअर्चा व त्रिकाल दिवाबत्ती हे कार्य परंपरेनुसासर गुरव पुजारी करत आले आहेत. यावेळी मंदिर हस्तांतरावरून गुरवांमध्ये वाद झाल्याने मंदिर परिसरात काही काळ भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर दोन्ही गुरवांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. मात्र, गेल्या वर्षी अशीच घटना घडल्यानंतर गुरवांमध्ये दोन गट पडले आणि प्रकरण न्यायालयात गेले असून, न्यायप्रविष्ट आहे.
कपालेश्वर महादेव मंदिराचे गुरव पुजारी आहेत. हे गुरववृत्तीचे अधिकार हस्तांतरणीय अधिकार आहे. दरम्यान, गुरववृत्तीच्या मालकी हक्क व अधिकार तसेच वहिवाटीच्या अंमलबजावणीबाबत विभागणी झालेली आहे. मात्र, त्यामध्ये काही गुरवांमध्ये वाद निर्माण झाल्याने थेट न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. वाद असलेल्या गुरवांच्या वाडवडिलांनी रूढी-परंपरा निश्चित केलेली आहे व वर्षाच्या 365 दिवसांचे विभाजन (पाळ्या) करण्यात आले आहे. न्यायालयीन कामकाजात दोन्ही बाजूंच्या गुरवांनी आवश्यक ती कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. यावेळी न्यायालयाने प्रतिवादी यांना दाव्याचा निकाल लागेपर्यंत तात्पुरत्यारीत्या गुरववृत्तीचे रूढी -परंपरेनुसार ठरलेल्या कालावधीमध्ये व पाळ्यांचा पदभार देण्यामध्ये अडथळा व हरकत करू नये, असे आदेश दिले होते. मात्र तरीदेखील हेमंत उर्फ पप्पू गाडे यांनी रविवार (दि.24) रोजी सकाळी परंपरेनुसार अनिल भगवान या गुरवांची पाळी असताना मंदिर हस्तांतरण केले नाही. यावेळी गाडे आणि भगवान कुटुंबीयांमध्ये शाब्दिक वाद निर्माण होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला.
दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तात्पुरत्यारीत्या परंपरेनुसार चालू असलेले कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरदेखील हेमंत उर्फ पप्पू गाडे यांच्याकडून मंदिर हस्तांतरणाच्या वेळी अडचणी निर्माण केल्या जात असल्याने एकप्रकारे गाडे यांच्याकडून न्यायालयाचा अवमान केला जात असल्याची भावना इतर गुरव मंडळींकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षीदेखील हेमंत गाडे यांनी याच अनिल भगवान यांना मंदिर हस्तांतरण करताना दानपेटीच्या दानावरून हाणामारी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेत अंतिम निकाल द्यावा, जेणेकरून मंदिराची
बदनामी थांबेल.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…