नाशिक

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

महायुतीत एकमेकांची विकेट पाडणार?

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी (दि.15) मतदान होत असून, प्रचाराच्या तोफा मंगळवारी (दि.13) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. नाशिक महापालिकेचे मैदान मारण्यासाठी भाजप, शिंदेसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट-मनसे युतीच्या प्रमुखांनी जाहीर सभा घेत नाशिकमध्ये अखेरच्या दिवसांत चांगलीच रंगत आणली. दरम्यान, येत्या गुरुवारी मतदान होताच दुसर्‍या दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. यावेळी महायुतीच्या भांडणात कोण कोणाची विकेट पाडणार? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
भाजपने शंभर प्लससाठी स्वबळाचा नारा दिल्याने महायुती तुटली. विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपसमोर मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत आव्हान उभे केले आहे. दुसर्‍या बाजूला उद्धव-राज ठाकरे एकत्र आल्याने निकालावर किती परिणाम होणार आणि कोणाचे गणित चुकणार, हेदेखील समजणार आहे. उद्धव-राज ठाकरे यांनी संयुक्त सभा घेऊन नाशिकमध्ये चांगली वातावरणनिर्मिती केली. विशेषत: त्यांनी शिंदेसेनेऐवजी भाजपला अधिक लक्ष्य केल्याने ही बाब विशेष चर्चेत आहे. ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावरठाकरे बंधूंची सभा झाल्यानंतर शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. रविवारी (दि. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उमेदवारांकरिता सभा घेतली. भाजपने तिकीट नाकारलेल्या काही प्रमुख चेहर्‍यांना शिंदेसेनेने उमेदवारी देत त्या-त्या प्रभागात आव्हान उभे केले आहे.

पक्षीय बलाबल
पक्ष निवडणूक लढविणार्‍यांंची संख्या
भाजप 118 + 2 पुरस्कृत
शिंदेसेना 80
शिवसेना ठाकरे गट 82
मनसे 29
कॉँग्रेस 22
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 20
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- 30
वंचित बहुजन आघाडी- 55
आम आदमी पार्टी (आप)- 34
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष- 09
भारतीय कम्युनिस्ट पक्ष- 01
अपक्ष- 490

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील प्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे सर्वाधिक 118 उमेदवार महापालिकेच्या मैदानात आहेत. पक्षाचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ. प्रा. देवयानी फरांदे यांची प्रतिष्ठा पणाली लागली आहे. शिंदेसेनेकडून उपनेते अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते, उपनेते दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ्, माजी खासदार समीर भुजबळ आदी नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल.

 

The propaganda guns will cool down today.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago