नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षात नेमके काय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच आज सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली,या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले.
16 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, या याचिकेची सूनवणी होण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती रमांनी यांच्या अध्यक्षतेखाली 3 जणांचे घटनापीठ नियुक्त करण्यात आले होते, या घटना पिठात आज सुनावणी झाली, शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली,
उपसभापती नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपत्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत, या दरम्यान राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, राज्यात स्थापन झालेले सरकारच बेकायदेशीर असल्याची एक अशा एकूण वेगवेगळ्या चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत या सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी झाली, शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टाकडे आठवडाभराची वेळ मागितली होती, यात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आता या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…