नाशिक

पोलिसांकडून आरोपींच्या बचावाची भूमिका

मंत्री भुसे, ग्रामस्थांचा आरोप; टेहरेजवळील अपघातात डॉक्टर ठार, तीन जखमी

मालेगाव : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे गावाच्या बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात 22 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टराचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या अपघातानंतर पोलीस प्रशासनाने आरोपींच्या बचावाची भूमिका बजावली असल्याचा आरोप शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे, तर दुसरीकडे अपघाताच्या ठिकाणी आरोपींना घेण्यासाठी आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कोणाची? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर बुधवारी (दि.11) रात्री सव्वादहाच्या सुमारास टेहरे गावाच्या बायपासकडून सोयगावकडे भरधाव एक्सयूव्ही 700 कार (एमएच 02 सीएल 8316) जात होती. चालकाचा ताबा सुटल्याने त्याच वेळेस मालेगावकडून टेहरे व मुंगसेकडे जात असलेल्या दुचाकीस (एमएच 41 एके 3071) तसेच दुसर्‍या दुचाकीला (माहीत नाही) जोरदार धडक दिली. या अपघातात मुंगसे येथील पशुवैद्यकीय डॉ. शेखर अहिरे यांना वाहनाने फरफटत नेल्याने ते वाहनाखाली दबून जागीच ठार झाले, तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ही कार पुढे जाऊन विजेच्या खांबावर आदळली. त्यामुळे सदर वीजखांब पडल्याने विजेच्या तारा लोंबकळत रस्त्यावर पडल्या होत्या. अपघाताचा आवाज येताच ग्रामस्थांनी अपघातास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुचाकी, विजेच्या तारा बाजूला करत अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविण्यात आले असून, जखमींवर मालेगाव व नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धाव घेतलेल्या ग्रामस्थांना कारमधील तीन ते चार लोकांनी तुम्ही आम्हाला ओळखले का?, आम्ही कोणाची माणसे आहोत तुम्हाला माहिती आहे का? अशी दमदाटी केली, तर काहींच्या हातांना चावा घेतला. यावेळी छावणी पोलिसांनीदेखील अपघात
केलेल्या कारमधील लोकांना मदत केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी शिक्षणमंत्री भुसे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना बरोबर घेत छावणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. मंत्री भुसे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली.

काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कोणाची?
अपघातानंतर काही वेळातच अपघातग्रस्त वाहनातील चालकासह अन्य तिघांना घेण्यास एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ या ठिकाणी आली. यातील चौघे काळ्या स्कॉर्पिओमध्ये बसून निघून गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती, तर या अपघातग्रस्त वाहनातील चालक उपचारासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. यानंतर तो फरार झाल्याने पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवरदेखील मंत्री भुसे यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच पंचनामा करण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचार्‍याला निलंबित करण्याची मागणीदेखील मंत्री भुसे यांनी केली आहे.

अपघातील पोलिसांच्या भूमिकेविषयी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी बोलणे झाले आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री यांच्या कानावर ही घटना टाकणार आहोत. अपघातातील दोषी पोलीस कर्मचार्‍यास निलंबित करा. तसेच अपघात करणार्‍यांना त्वरित अटक करा.
– दादा भुसे, शिक्षणमंत्री

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

23 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

23 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

23 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

23 hours ago