सिडको: दिलीपराज सोनार
शहरात खुनाची मालिकाच सुरू झाली असून, नाशिकरोड येथे भल्या पहाटे एकाचा कोयत्याने वार करून खून झाल्याची घटना घडून सहा तास देखील उलट त नाही तोच सातपूर कॉलनी भागात खुनाची दुसरी घटना घडली. जन्मदात्या आईचा व्यसनी मुलाने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगल संतोष घोलप (65) असे मृत महिलेचे नाव असून, संशयित म्हणून स्वप्नील घोलप या मुलाला ताब्यात घेतले आहे. खुनाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करीत आहेत, शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली असतानाच गुन्हेगार मात्र पोलिसांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत आहेत, त्यामुळे पोलिसांनी आता अधिक कडक उपाय करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पाहणी केली, फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…