उत्सवात दररोज दोन हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती
नाशिक : प्रतिनिधी
बंगाली संस्कृती, धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकतेचा वारसा जपणार्या नाशिक बंगिया परिषदेच्या (एनबीपी) दुर्गापूजा उत्सवाने रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. सन 2002 मध्ये काही मोजक्या सदस्यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उत्सव आज नाशिकमधील प्रमुख दुर्गापूजा सोहळ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. दरवर्षी उत्सवाच्या काळात दररोज सुमारे 1,500 ते 2,000 नागरिक येथे भेट देतात. श्रद्धा, समर्पण, सांस्कृतिक परंपरा आणि सामूहिक सहभागाच्या बळावर परिषदेने ही वाटचाल यशस्वी केल्याचे रीटा मैती यांनी सांगितले.
नाशिकमध्ये दामोदर चौक (पाथर्डी फाटा) येथे सामूहिक दुर्गापूजा सुरू करण्याची संकल्पना सन 2002 मध्ये रीटा मैती, नीलेश रॉय या बहीण-भावंडांसह मोलय बॅनर्जी, शिबू रॉय आणि त्यांच्या समविचारी मित्रमंडळींनी मांडली. दुर्गापूजेतील विविध धार्मिक विधी, पारंपरिक प्रथा आणि आयोजनातील बारकावे यांची पुरेशी माहिती नसतानाही त्यांनी माँ दुर्गेवरील श्रद्धेच्या बळावर या उपक्रमाला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या अडचणींवर मात करून सर्व सदस्यांनी एकत्र येत उत्सवाचा विस्तार केला.
बंगाली परंपरा आणि धार्मिक विधींचे अस्सल स्वरूप जपण्यासाठी परिषदेने कोलकात्याहून अनुभवी पुजारी, पारंपरिक स्वयंपाकी आणि ढाक वादकांना आमंत्रित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पूजेतील पारंपरिक विधी, बंगाली खाद्यसंस्कृती आणि उत्सवाचे वैशिष्ट्य जपता आले. वातावरण टिकवून ठेवण्यास मदत झाली. गेल्या 25 वर्षांत या उत्सवाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत गेला.
या परिषदेच्या वाटचालीत हितचिंतक, जाहिरातदार, प्रायोजक आणि समाजातील विविध व्यक्तींनी सहकार्य केले. त्यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि पाठबळामुळे उत्सवाचे आयोजन दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात करणे शक्य झाले. मंडप उभारणी, पूजेची व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, पाहुण्यांचे स्वागत, तसेच देणग्या आणि प्रायोजकत्व मिळविणे अशा विविध कामांत सदस्य सहभागी होतात. प्रत्येक सदस्य आपापल्या परीने योगदान देत असल्याने परिषदेच्या कार्यात कुटुंबासारखी एकजूट असल्याचे रीटा मैती यांनी सांगितले.
या विशेष आयोजनासाठी प्रबल रॉय, जॉयदीप भट्टाचार्य, इंद्रनील सन्याल, नीलेश रॉय, अनिमेष बागची, तारक बॅनर्जी, बिप्लब साहू, मोलय बॅनर्जी, बिधान हाजरा, सौरव भौमिक, ब्रोजेन आचार्य, देबाशीष कुंडू, बिस्वरूप मैती, रघुनाथ दास, पार्थो ताराफदार आणि एनबीपी महिला गटाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या महोत्सवाच्या काळात दररोज पुष्पांजलीनंतर प्रसादवाटप करण्यात येईल. दुपारी 1.30 ते 3.30 या वेळेत महाभोग, सायंकाळी 7.30 वाजता संध्या आरती आणि रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत 17 ऑक्टोबर रोजी बाऊल गायक राजू दास बाऊल यांचे गायन होईल. 18 ला नृत्याली भरतनाट्यम अकादमी, नाशिक यांचा कार्यक्रम सादर होईल. 19 ऑक्टोबरला सारेगममची उपविजेती मयूरी हिचा मयूरीज मंत्रा लाइव्ह हा कार्यक्रम होणार आहे. या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक प्रबल रे, अध्यक्ष इंद्रनील सन्याल, सरचिटणीस नीलेश रॉय आणि खजिनदार बिधान हाजरा, तसेच दुर्गापूजा आयोजन समितीचे अध्यक्ष अनिमेष बागची, सरचिटणीस तारक बॅनर्जी व बिप्लब साहू यांनी नागरिकांना उत्सवात सहभागी होण्याचे व महोत्सवाला सहकार्याचे आवाहन केले आहे.
महोत्सवाला 16 पासून प्रारंभ
महोत्सवाची सुरुवात 16 ऑक्टोबर रोजी महाषष्ठीच्या पूजेने होईल. सकाळी 9.29 वाजता पूजा, सकाळी 11.30 वाजता पुष्पांजली, तर सायंकाळी देवीचे बोधन, आमंत्रण आणि अधिवास हे विधी होतील. 17 ऑक्टोबर रोजी नवपत्रिका प्रवेश आणि पुष्पांजलीचे आयोजन केले आहे. 18 ऑक्टोबरला धार्मिक विधी आणि पुष्पांजली होईल. 19 ला संधिपूजा आणि पुष्पांजली, तर 20 तारखेला महानवमीच्या पूजेसह हवन होणार आहे. 21 ऑक्टोबर रोजी दशमी पूजा, दुपारी 2 वाजता सिंदूर उत्सव आणि सायंकाळी देवीचे विसर्जन होईल.
The Silver Jubilee Journey of the Durga Puja Festival at Pathardi Phata
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…