नाशिक

डीजीपीनगरला लाखो लिटर पाण्याची नासाडी

निष्काळजीमुळे जलवाहिनी फुटली

नाशिक : प्रतिनिधी
राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले असून, भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी 16 ऑक्टोबरपासून 10 टक्के पाणी कपातीचे निर्देश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहे. पाणीबचतीसाठी शासन प्रयत्न करत असताना दुसर्‍या बाजूला मात्र स्मार्ट सिटीच्या निष्काळजीपणामुळे प्रभाग क्रमांक 23 मधील डीजीपीनगर येथील जॉगिंग ट्रॅक येथे खोदकाम करताना चार आणि सहा इंच व्यासाच्या दोन जलवाहिन्या फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींना कुठलीही माहिती न देताच स्मार्ट सिटीच्या कारभारावर नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घटनेची माहिती मिळताच प्रभागाच्या नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर आणि कार्यकारी अभियंता विशाल गरूड यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. तसेच नगरसेविका अधिकार्‍यांशी चर्चा करून जलवाहिन्यांची तत्काळ् दुरुस्ती करण्याच्या सूचना नगरसेविका कुलकर्णी यांनी दिल्या
त्यानंतर उपअभियंता ज्ञानेश्वर जगताप आणि कनिष्ठ अभियंता धनेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. खोदकाम करताना जलवाहिन्यांची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. नवरात्राच्या काळातच या घटनेमुळे डीजीपीनगर-1, वाराहीनगर, रविशंकर मार्ग, खोडेनगर, विधातेनगर, बँक कॉलनी, अरण्येश्वर महादेव मंदिर परिसर तसेच मनोज गॅरेजमागील भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. परिणामी सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 23 अंतर्गत डीजीपीनगर-1 येथील जॉगिंग ट्रॅकजवळ चार आणि सहा इंच व्यासाच्या दोन जलवाहिन्या
फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

Lakhs of litres of water wasted at DGP Nagar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

24 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

28 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

32 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

44 minutes ago