देवळाली कॅम्पला स्कूल ऑफ आर्टिलरीची प्रात्यक्षिके
नाशिक : प्रतिनिधी
शत्रूच्या उरात धडकी भरवणारा आवाज, तोफगोळ्यांतून अचूक लक्ष्याचा वेध घेणारी आधुनिक उपकरणे, आग ओकणारे रणगाडे, युद्ध मैदानावर उठलेले धुराचे लोट, अचूक भेद घेणारे अग्निबाणांचा वर्षाव, क्षणात शत्रूच्या ठिकाणांचा चक्काचूर करणारे रणगाडे, युद्धभूमीतही शिस्त आणि संयमाचे पालन करणारे भारतीय जवान याचे प्रात्यक्षिक देवळाली येथील बहुला रेंजवर बुधवारी (दि. 21) पाहायला मिळाले.
यावेळी हॉवित्झर, व्रज, बोफोर्स, धनुष्य आदींसह आठ तोफा आणि एकाच वेळी सात ठिकाणांहून झालेला हल्ला शोधून काढणारे स्वाती रडार, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर आदी काही सेकंदात निश्चित लक्ष्य गाठले. याबाबतचे भारतीय लष्कराकडून या युद्धसरावाचे रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचा प्रमुख वार्षिक अग्निशक्ती प्रात्यक्षिक व प्रशिक्षण उपक्रम एक्स तोफची स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली फील्ड फायरिंग रेंज येथे यशस्वीपणे पार पडला.
यंदा प्रथमच सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) तोफपथक, तसेच भारतीय नौदलाचे ड्रोनसह नौसैनिक या सरावात सहभागी झाले होते. पॅराशूट रेजिमेंटचे पॅराट्रुपर्स, पॅरामोटर्स व हँड ग्लायडर्ससह आपली कौशल्ये सादर करताना विशेष आकर्षण ठरले.
हा भव्य सराव लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना (अतिविशिष्ट सेवापदक, सेनापदक, विशिष्ट सेवापदक), कमांडंट-स्कूल ऑफ आर्टिलरी व कर्नल कमांडंट-रेजिमेंट ऑफ आर्टिलरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल मनीष एरी होते.
यावेळी एन. एस. सरना यांनी भारतीय लष्कर आत्मनिर्भरकडे यशस्वी वाटचाल करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन तसेच डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स येथील प्रशिक्षणार्थी अधिकारी, नेपाळ आर्मी कमांड अँड स्टाफ कॉलेजमधील विद्यार्थी अधिकारी, भारतीय सेनेचे वरिष्ठ अधिकारी, नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, तसेच महाराष्ट्रातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक्स तोफची-2026 दरम्यान आधुनिक अग्निशक्ती व निगराणी तंत्रज्ञानाचे प्रभावी समन्वय सादर करण्यात आला. तोफा, रॉकेट प्रणाली, ड्रोन तसेच हवाई साधनांचा समावेश असलेल्या या सरावाने प्रेक्षकांना थक्क केले. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे दर्शन घडवत स्वदेशी बनावटीच्या तोफांचे प्रत्यक्ष गोळीबार प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
The thrill of the battlefield… Accurate aiming of the target!
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…