नाशिक: प्रतिनिधी
नांदूर नाका येथे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या कार्यकर्त्यांकडून राहुल धोत्रे यांच्यासह कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा आज सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यात माजी नगरसेवक उद्धव निमसे हे व्हिडिओ मध्ये दिसून आले होते, त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात काही संशयितांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे. आता या जखमी तरुणाचा उपचार सुरू असताना आज सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे गुन्ह्याचे कलमे देखील बदलणार असल्याने उद्धव निमसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…