मनमाड : प्रतिनिधी
मनमाड-नांदगाव महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. दोन दिवसांपूर्वीच दोन मोटार-सायकलच्या अपघातात दोन जण ठार झाले होते. बुधवारी (दि. 27) मोटारसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात एक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
पानेवाडी इंधन कंपनीच्या जवळपास ही घटना घडल्याचे समजते. मनमाड ते नांदगाव हा महामार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. रोज अपघात होऊन यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मनमाडवरून नांदगावच्या दिशेने जाणार्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. समाधान हिरे (रा. साकोरा) असे या तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच याच महामार्गावर हिसवळ शिवारात दोन मोटारसायकलचा अपघात झाला होता. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले होते. दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस तपास करत आहेत.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…