नाशिक

गोदापात्र पाणवेलींनी व्यापले

नदी स्वच्छतेची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक व पंचवटीतील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली व कचरा जमा झाला आहे. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या एक-दीड वर्षावर आलेला आहे. गोदावरी नदीवरील रामकुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा स्नान पर्वणी होत असते. त्याच रामकुंडापासून अवघ्या 500 मीटरच्या अंतरावर अहिल्यादेवी होळकर पूल ते रामवाडी पुलाच्या दरम्यान गोदावरी नदीपात्रात अनेक महिन्यांपासून पाणवेली जमा झालेल्या आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कचराही जमा झालेला आहे. सद्यस्थितीत कुंभमेळ्याच्या निमित्ताने सरकार आणि प्रशासनाची तपोवनातील झाडे तोडून प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी जी तत्परता चालू आहे, ती मात्र गोदावरी स्वच्छ-निर्मळ करण्यासाठी दिसून येत नाही. नदी स्वच्छ-निर्मळ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेने स्वच्छ गोदा बॉण्डद्वारे 200 कोटी रुपये अवघ्या दोन तासांत मिळवले. पण त्या 200 कोटी रुपयांतून या गोदावरी नदीपात्र-किनारे साफसफाई-स्वच्छता-निर्मळ करण्यासाठी दोन रुपये पण खर्च केल्याचे दिसून येत नाही, तर मग हे 200 कोटी रुपये आलेले कधी आणि कसे खर्च करणार, हा नाशिककरांचा सरकारला आणि महानगरपालिका आयुक्तांना प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिककरांना दिले पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

The watercourses were covered with water lilies.

 

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

3 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

31 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

37 minutes ago