नाशिक

उपजिल्हा रुग्णालयात होणार डायलिसिस

चांदवडला किडनी रुग्णांना दिलासा; रुग्णालयात 8 बेडची सुविधा

चांदवड : वार्ताहर
एचएएल आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस विभाग कार्यान्वित आहे. ही सुविधा ग्रामीण भागातील किडनी रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे. या सुविधेमुळे रुग्णांना आता अत्याधुनिक उपचार वेळेवर मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात 27 नोव्हेंबरपासून हा विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागात 6 अधिक 2 असे एकूण 8 अत्याधुनिक डायलिसिस बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे एकाच वेळी 8 रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. विभाग सुरू झाल्यापासून आतापर्यंत चार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, शहरासह परिसरातील किडनी रुग्णांना स्थानिक ठिकाणी डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाली आहे.

त्रास अन् खर्च वाचणार

यापूर्वी डायलिसिस उपचारांसाठी चांदवड, वडनेरभैरव, दिंडोरी, सटाणा, कळवण, उमराणा व परिसरातील रुग्णांना नाशिक किंवा इतर मोठ्या शहरांत धाव घ्यावी लागत असत. यात रुग्णांचा वेळ, पैसा आणि शारीरिक कष्ट मोठ्या प्रमाणावर खर्च होत होते. आता ही सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्याने रुग्णांची होणारी धावपळ थांबणार आहे. प्रशासनाने भविष्यात या विभागाच्या क्षमतेत आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

तज्ज्ञ कर्मचार्‍यांची नियुक्ती

डायलिसिस विभागाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विशेष प्रशिक्षित पथकाची नेमणूक केली आहे. यात 2 डायलिसिस टेक्निशियन, 1 स्टाफ नर्स आणि 1 स्वच्छता कर्मचार्‍याचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार करतील. तसेच, या विभागात होणारे सर्व उपचार महात्मा जोेतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत दिले जाणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आधार मिळणार आहे.

चांदवड उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सुविधा सुरू झाल्याने गोरगरीब रुग्णांची सोय झाली आहे. चांदवडसारख्या ग्रामीण भागात ही सुविधा मिळत असल्याने गैरसोय मिटणार आहे. विशेषतः योजनांचा लाभ मिळणार असल्याने मोफत उपचार होतील. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व स्टाफची नियुक्ती केली आहे.
-डॉ. राहुल आहेर, आमदार

Dialysis will be done at the sub-district hospital.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

34 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

55 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

59 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago