नाशिक

मखमलाबादला बंगल्यात चोरी; 3 लाखांचा ऐवज, दुचाकी लंपास

आळंदी कॅनॉल परिसरातील घटना

पंचवटी : प्रतिनिधी
मखमलाबाद भागातील सुळेवाडी रोडवरील एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरमालक व त्यांचे कुटुंबीय घरात गाढ झोपेत असताना चोरट्याने तीन लाख 45 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि दुचाकी, असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी रामचंद्र पिंगळे (वय 61, रा. शिवसृष्टी बंगलो, शहाजी चौक, सुळेवाडी रोड, आळंदी कॅनॉलजवळ, मखमलाबाद) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पिंगळे आपल्या कुटुंबीयांसह 18 जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपलेले होते. मध्यरात्री 11.45 ते 19 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा शिताफीने तोडून आत प्रवेश केला.
कुटुंबीय गाढ झोपेत असल्याचा फायदा उठवत चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण तीन लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरला. एवढेच नव्हे, तर जाताना चोरट्याने घराच्या आवारात उभी असलेली हिरो होंडा कंपनीची सीडी डिलक्स मोटारसायकल (एमएच 20- 2037)देखील चोरून नेली.
सकाळी कुटुंबीयांना जाग आली असता, घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने म्हसरूळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे करत आहेत.

Theft at a bungalow in Makhmalabad; valuables worth ₹3 lakh and a two-wheeler stolen.

 

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago