नाशिक

सायखेड्याला लक्ष्मीनारायण मंदिरात चोरी; ऐवज लंपास

निफाड ः तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील शिवापूर, देवगाव, नैताळे यापाठोपाठ आता सायखेडा येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यात देवस्थानांना लक्ष्य करण्याच्या सलग घटना घडत असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.
पुजारी सुमित जगदीश तिवारी (वय 38, रा. सायखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत, मंदिराच्या दरवाजाची चावी माझ्याकडे असते व दुसरी चावी मंदिरासमोरील तटबंदीजवळील महावितरणच्या पेटीत ठेवलेली असते. 11 डिसेंबरला सकाळी आठला मी मंदिर उघडल्यावर मौल्यवान साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर समोरील दुसरी चावी ठेवलेला महावितरणची पेटी उघडलेली व चावी खाली पडलेली दिसली. या घटनेबाबत मंदिराचे खर्च पाहणारे श्रीनिवास काशीनाथ काबरा (रा. सायखेडा) तसेच मंदिराचे वारसदार
सर्वेश मालपाणी (रा. वावी) आणि संतोष केला (रा. गांधीनगर, नाशिकरोड) यांना विचारले असता, त्यांना काही माहिती नसल्याचे सांगितले. चोरट्याने पेटीतील चावी वापरून मंदिराचे कुलूप उघडून गुरुवारी (दि. 10) सायंकाळी 6.30 पासून ते शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान आत प्रवेश केला. मंदिरातून 20 ग्रॅम वजनाची 2100 रुपये किमतीची चांदीची साखळी, 35 ग्रॅम वजनाची 3500 रुपये किमतीची चांदीची पिंड, नऊ किलो वजनाचा 4,500 रुपये किमतीचा पितळी घंटा, एक हजाराची पितळी पंचारती, तसेच देवीच्या मूर्तीवरील एक ग्रॅम सोन्याचे 9500 रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र असा एकूण 20 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याचे म्हटले आहे. फिर्यादीवरून सायखेडा पोलीस ठाण्यात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago