पंचवटी : प्रतिनिधी
’दीदी चल तुला घरी सोडतो’ असे सांगून मोपेडवर बसवलेल्या युवतीला गुंगी येणारा पदार्थयुक्त कोल्ड्रिंक प्यायला देऊन तपोवनात नेत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उमेश व रॉकी या दोघा युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री 11.30 ते गुरुवारी सकाळी 8.30 वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री 11.30 वाजता अशोका मार्ग येथील सिग्नल परिसरातून जात असताना उमेश व रॉकी हे पांढर्या रंगाच्या अॅक्टिवा (एमएच 15-जीपी 2767) वरून आले. त्यातील उमेशने ’दीदी चल तुला घरी सोडतो’, असे सांगून रॉकी चालवत असलेल्या मोपेडवर बसवले. उमेशने हातातील कोल्ड्रिंक पीडितेला पिण्यास दिले. त्यामुळे तिला नशा झाली. तशाच अवस्थेत पीडितेला तपोवनातील निर्जनस्थळी नेऊन उमेशने बलात्कार केला. त्यास रॉकीने मदत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. उपनिरीक्षक एम. एल. शेख तपास करत आहेत.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…